कपडे लवकर मागितले, शिंप्याने कैची खुपसली; किडनी निकामी होऊन तरुणाचा मृत्यू, मुंबईतील घटना


 मुंबई: शिवलेले कपडे लवकर मागितले म्हणून झालेल्या वादात शिंप्याने २२ वर्षीय तरुणाच्या पोटात कैचीच खुपसली.

धारावीत हा प्रकार घडला असून जखमी तरुणावर सायन रुग्णालयात उपचार सुरु असताना किडनी निकामी होऊन शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संगम गल्ली येथे चांद आलम शेख यांचा महिलांच्या कपड्याचे शिवणकाम करण्याचा कारखाना आहे. अटक आरोपी बद्दिन खान (२२) हा या ठिकाणी काम करायचा. तर त्याने शिवलेल्या कपड्यांचे धागे तोडण्याचे काम मयत नकिब अब्दुल सत्तार (२२) हा करायचा. २ डिसेंबर रोजी सकाळी बद्रुद्दिन आणि नकीब यांच्यात कामावरून वाद झाले.

बदुद्दिन हा कपडे शिवण्यात टंगळमंगळ करतोय, असा आरोप नाकिबने केला. त्यावरून त्यांच्यात मोठ्याने वाजले आणि रागाच्या भरात बद्रुद्दीनने कपडे कापण्याची पितळी कैची थेट त्याच्या पोटात खुपसली. पीडितचा भाऊ तैकिर आलम यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला.

जखमी तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने याप्रकरणी आम्ही हल्लेखोरावर हत्येचे कलम वाढवले आहे. त्याला आधीच कलम ३०७ व ५०४ अंतर्गत अटक करण्यात आली होती.व- विजय कांदळगावकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, धारावी पोलीस ठाणे

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?