बेळगावात पाय ठेवाल तर कायदेशीर कारवाई करू! कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची पुन्हा धमकी

 



दोन राज्यांतील सीमाप्रश्न केव्हाच संपला आहेतुमच्या आक्षेपांवरचा वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहेतेथेच लढू . इथे येऊन राज्याची शांतता व सुव्यवस्था बिघडवू नका .

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटक सरकार दिवसेंदिवस आक्रमक होत असतानाही मिंधे सरकारकडून मात्र मिळमिळीत आणि बोटचेपी भूमिका घेतली जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा, बेळगावात पाय ठेवाल तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी दिली आहे. महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यामुळे बेळगावातील वातावरण बिघडेल, असे बोम्मई यांनी म्हटले आहे.

सीमा भागातील प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. या मंत्र्यांच्या नियोजित बेळगाव दौऱ्याला कर्नाटक सरकारकडून आक्षेप घेण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी तर, बेळगावमध्ये येण्याचे धाडस केल्यास कायदेशीर उपाययोजना केल्या जातील, असा इशारा दिला आहे. इशारा दिल्यानंतरही महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकात आल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्याची माहिती बोम्मई यांनी दिली.

महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मी चर्चा करून तुमच्या मंत्र्यांना इथे पाठवू नका असे आवाहन करणार आहे. याबाबत आम्ही आधीच मुख्य सचिवांद्वारे पत्र पाठवले आहे. मंत्र्यांनी बेळगावात येण्यासाठी ही योग्य वेळ नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ शकते, असे बोम्मई पत्रकारांशी बोलताता सांगितले.

महापरिनिर्वाण दिनी वाद नको - देवेंद्र फडणवीस

'मंत्र्यांचा दौरा जो काही होता, हा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त होता आणि एका कार्यक्रमासाठी मंत्री तिथे जाणार होते. या संदर्भात कर्नाटकचे काही म्हणण आहे, महाराष्ट्राचही काही म्हणणं आहे. मंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना जाण्यापासून कोणी रोखूही शकत नाही. महापरिनिर्वाणदिन हा आपल्यासाठी फार मोठा दिवस आहे आणि त्या दिवशी एखादं आंदोलन व्हावं, एखादी चुकीची घटना पिंवा वाद नको, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मिंधे सरकारने गुडघे टेकलेमंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द

सीमा प्रश्नावर समन्वयासाठी नेमलेल्या समितीमधील मंत्री 3 डिसेंबरला बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. तो दोन दिवस म्हणजे 6 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी बेळगावला येऊ नये, असा इशारा देताच मिंधे सरकारने कर्नाटकसमोर गुडघे टेकत उद्याचा बेळगाव दौरा रद्द केला आहे.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..