पेटत्या चितेसमोर तृतीयपंथीनी अघोरी पूजा करण्यामागील कारण आले समोर, कारण ऐकून तुम्हाला धक्काच बसेल
पुणे : पुणे शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत दोन तृतीयपंथीयांनी पेटत्या चितेसमोर जादूटोणा केल्याचा प्रकार समोर आला होता. वैकुंठ स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याने रात्रीच्या दरम्यान ही घटना पहिल्याने त्याने विश्रामबाग पोलिसांना ही माहिती कळवली होती.
पुणे
शहरातील वैकुंठ स्मशानभूमी येथे पेटत्या चितेसमोर अघोरी पूजा करत असतांना दोन
तृतीयपंथीयांना पुणे पोलीसांनी रंगेहाथ पकडले होते.
स्मशानभूमीत
एका पेटत्या चितेसमोर दोघा तृतीयपंथीयांनी अघोरी पूजा मांडली होती, यातील एकाच्या आईला कॅन्सर झाल्याने ही अघोरी पूजा करण्याचा
प्रयत्न सुरू होता.
प्रेत जळत
असतांना अघोरी पूजा केली तर आईंच्या अंगातून कॅन्सर निघून जातो असा समज या
तृतीयपंथीयांचा होता, या प्रकरणी
दोघांना अटक करण्यात आली होती.
लक्ष्मी
निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे
असून तपासात धक्कादायक बाबींचा खुलासा करण्यात आला आहे.
पुण्यातून
ही घटना समोर आल्याने संपूर्ण पुणे शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून
अंधश्रद्धेला आजही बळी पडणाऱ्यांची संख्या दिसून येत असल्याचे धक्कादायक वास्तव
समोर आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा