मोठा भाऊ दुकानातून चहा प्यायला गेला अन अवघ्या काही मिनिटात लहान भावाचा 18 जणांनी कोयत्याने वार करत निर्घृण खून केला.आरोपी तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी हवेत गोळीबार करत परिसरात दहशत पसरवली.
पिंपरी
पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.विशाल नागू गायकवाड (रा. मोरेवस्ती, चिखली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा मोठा भाऊ
अर्जुन नागू गायकवाड (वय 32) यांनी
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दाद्या उर्फ विशाल मरिबा कांबळे, राजू मरिबा कांबळे, सिद्धया
मरिबा कांबळे,
कच्चा उर्फ मिलिंद मरिबा कांबळे
(सर्व रा. फुलेनगर, चिंचवड), विशाल लष्करे (रा. रामनगर, चिंचवड), सीजे उर्फ
चैतन्य जावीर,
ओमकार शिंदे, यश कुसाळकर, करण
गायकवाड, रोहित मांजरेकर, सुरज मोहिते, निलेश
लष्करे, बालाजी कोकाटे, मोहन विटकर, अल्पवयीन
मुलगा आणि दोन ते तीन अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी राजू मरिबा कांबळे, सिद्ध्या
मरिबा कांबळे,
मिलिंद मरीबा कांबळे, मोहन विटकर या आरोपींना तसेच एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात
आली आहे.
पोलिसांनी
दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी
अर्जुन आणि त्यांचा लहान भाऊ विशाल असे दोघेजण ते वॉशिंग सेंटर चालवतात. शुक्रवारी
सायंकाळी लाईट नसल्याने वॉशिंग सेंटर मधील काम बंद होते. सायंकाळी सव्वासहा
वाजताच्या सुमारास अर्जुन हे वॉशिंग सेंटर समोर रस्त्याच्या पलीकडील बाजूला चहा
पिण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी वॉशिंग सेंटरवर आले. आरोपींनी विशालवर कोयत्याने
वार केले. वॉशिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या कामगाराने धावत येऊन याबाबत अर्जुन
यांना सांगितले. अर्जुन आणि कामगार वॉशिंग सेंटरकडे जात असताना एका आरोपीने
पिस्तुलातून दोन ते तीन गोळ्या हवेत झाडल्या. गोळीबार झाल्याने परिसरातील
दुकानदारांनी दुकाने बंद केली.
अर्जुन
यांनी वॉशिंग सेंटरमध्ये आला तोवर आरोपी पसार झाले होते अन विशाल रक्ताच्या
थारोळ्यात पडला होता. त्याच्या डोक्यावर, पाटीवर, पोटावर, पायावर, खांद्यावर कोयत्याने वार केले होते. जखमी विशालला खासगी
रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित
केले.
दोघे भाऊ
मागील चार वर्षांपासून वॉशिंग सेंटर चालवत आहेत. जवळच विशाल कांबळे याचेही वॉशिंग
सेंटर आहे. अर्जुन यांचे वॉशिंग सेंटर चांगले चालत असल्याने व्यावसायिक स्पर्धेतून
विशाल कांबळे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून विशाल गायकवाड याचा खून केला.
तसेच सन 2017 मध्ये विशाल कांबळे यांचे कुटुंबीय आणि
अर्जुन यांच्यात भांडण झाले होते. त्याचाही राग आरोपीच्या मनात होता.
अटक
आरोपींना शनिवारी (दि. 3) न्यायालयात
हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका
अल्पवयीन मुलासह आणखी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.