मुंबई - बॉलिवूडचा भाई जान म्हणजेच, अभिनेता 'सलमान खान' या वर्षाच्या अखेरीस त्याचा पुढचा चित्रपट 'किसी का भाई किसी का जान' घेऊन येत आहे. काही दिवसांपूर्वी सलमानने चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक आणि टिझर शेअर केला होता, तो पाहिल्यानंतर चाहत्यांच्या उत्साहाचा पारा चढला होता.
अभिनेता
सलमान खानने नुकतंच त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर या चित्रपटातील त्याचा आणखी एक
लूक शेअर केला असून, यामध्ये
त्याचा डॅशिंग अवतार पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर सलमानचा हा लूक तुफान
ट्रेंड होताना दिसून येत आहे. बहुचर्चित ‘किसी का
भाई किसी की जान’
या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं
असून, सेटवरील स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे.
या फोटोत
दबंग खान खूपच हटके दिसत आहे. लांबलचक केस, लेदर जॅकेट
आणि काळा चष्मा असा काहीसा भाईजानचा लूक आहे. त्याचा ब्लॅक लूक चाहत्यांच्या
पसंतीस उतरला असून, अनेकांनी
या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. फॅन्स भाई जानच्या या
लूकवर लाईक्सचा पाऊस पाडत आहेत. दरम्यान, सलमानच्या
या फोटोतुन हा एकडान्स सिक्वेन्स असल्यासारखे वाटते. मागे बॅकग्राऊंड डान्सर्स
दिसत आहेत तर सलमान खान स्टायलिश पोझ मध्ये उभा आहे.