Type Here to Get Search Results !

आधार कार्डधारकांसाठी खुशखबर, आता ट्रेनमध्ये मिळणार खास सुविधा!


 वी दिल्ली : तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आता रेल्वे या प्रवाशांना मोठी सुविधा देत आहे.

याबाबतची माहितीही आयआरसीटीसीने (IRCTC) दिली आहे.

आता तुम्हाला तुमचे केवायसी अपडेट करावे लागेल. यानंतर कन्फर्मेशन लिंकवर क्लिक 

करून माहिती द्यावी लागेल. आता तुम्हाला IRCTC वेबसाइटवर लॉग आउट करून पुन्हा 

लॉग इन करावे लागेल.

यासाठी तुम्ही सर्वात तुमच्या IRCTC आयडीने लॉग इन करणे आवश्यक आहे. येथे होम 

पेजवर, तुम्हाला 'माय अकाउंट' ऑप्शनमध्ये 'लिंक युअर आधार' वर क्लिक करावे लागेल. 

यानंतर, तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये प्रविष्ट केलेली माहिती, जसे की नाव, आधार 

नंबर आणि व्हर्च्युअल आयडी टाकावा लागेल.

त्यानंतर चेक बॉक्समध्ये जाऊन 'सेन्ड ओटीपी' निवडावा लागेल. रेल्वे मंत्रालयानेही ट्विट 

करून याबाबत माहिती दिली आहे. प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन रेल्वे 24 तिकिटे बुक 

करण्याची सुविधा देत आहे. जर यूजर आयडी आधारशी लिंक असेल, तर एका महिन्यात 

तिकीट बुक करण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. जर आधार 

लिंक नसेल तर तुम्ही फक्त 12 तिकिटे बुक करू शकता. दरम्यान, यापूर्वी ज्यांचे आयडी 

आधार कार्डसोबत लिंक नव्हते ते फक्त 6 तिकिटे बुक करू शकत होते.

दरम्यान, IRCTC ने सांगितले आहे की जर तुमचे आधार कार्ड देखील IRCTC शी लिंक 

असेल तर तुम्हाला दर महिन्याला 24 आरक्षित तिकिटे बुक करण्याची सुविधा मिळेल.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies