मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन जितके मोठे स्टार आहेत तितकेच ते ग्राउंड टू अर्थ देखील आहेत. बहुदा हा त्यांचा गुण त्यांची नात नव्या नवेली नंदाने देखील घेतल्याचे दिसून येते.
एक स्टार
कीड असूनही नव्या अगदी सर्वसामान्यांप्रमाणे रस्त्यावर उतरून चाट पापडी आणि भेळीचा
आस्वाद घेताना दिसली. भोपाळ सारख्या अनोळखी शहरातून वावरताना नव्याने कोणतेही
स्टारडम न बाळगता साधारण मुलीप्रमाणे एका साध्या ठिकाणी जाऊन केसही कापल्याचे
फोटोवरून समजते. नव्या देखील ग्राऊंड टू अर्थ आहे हे पाहून अनेकांनी तिचे सोशल
मिडयावर कौतुक देखील केले आहे.
लो मेकअप आणि साधी वेशभूषा यामुळेच नव्याचा लूक
नेटकऱ्यांना भावला आहे. नव्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये चाट,पकोडे,भेळ अशा
स्ट्रीट फूडची झलक पाहायला मिळते. त्यासोबतच भोपाळच्या त्या साध्या गल्ल्या देखील
नव्याने आपल्या कॅमेऱ्यात कॅप्चर केल्याचे दिसून येते. नव्याच्या या फोटोजवर
अभिनेत्री अनन्या पांडेसह तिची आई श्वेता बच्चनने देखील कमेंट केली आहे.