अडीच वर्षांनंतरही सुशांतच्या 'त्या' घरात कोणीच राहायला तयार नाही; ब्रोकरने सांगितला धक्कादायक अनुभव


 मुंबई - बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील त्याच्या राहत्या घरी 14 जून 2020 जून रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर विलेपार्ले येथील पवनहंस येथे असलेल्या स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह रिया चक्रवर्ती, श्रद्धा कपूर आणि वरुण शर्मासह बॉलिवूड मधील इतर सुद्धा कलाकार उपस्थित होते.

सुशांत सिंह राजपूतने टेलिव्हिजनपासून करिअरची सुरुवात करत बॉलिवूडपर्यंत मजल गाठली होती. बॉलिवूडमध्येही त्याने दमदार भूमिका साकारल्या आणि त्याच्या याच कामाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. मात्र, असंख्य चाहते त्याच्या निधनाच्या धक्क्यातून अजूनही सावरले नसल्याचं दिसून येत आहे. सोशल मीडियावर अजूनही अभिनेत्याचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

दरम्यान, आता सुशांतच्या मृत्यूला अडीच वर्ष उलटून गेली असली तरी, मुंबईतील वांद्रे इथल्या त्याच्या राहत्या घरी फ्लॅटमध्ये अद्यापही कोणीच नवीन भाडेकरू मिळत नाहीये. नुकतंच रफीक मर्चंट नावाच्या एका रिअल इस्टेट ब्रोकरने या सी-फेसिंग अपार्टमेंटचा एक व्हिडीओ शेअर केला. असून याबद्दल माहिती दिली आहे.

यावेळी त्याने सांगितलं की, ‘महिन्याला पाच लाख रुपये इतकं या फ्लॅटचं भाडं असून, सुशांतच याठिकाणी निधन झालं आहे. आणि त्यामुळेच का होईना लोक येथे राहायला घाबरत आहेत. असं रफीकने एका मुलाखतीत म्हटलंय. आधी जेव्हा लोकांना कळायचं की याच फ्लॅटमध्ये सुशांतचं निधन झालं होतं, तेव्हा लोक हा फ्लॅट बघायलासुद्धा यायचे नाही. आता बऱ्याच कालावधीनंतर हळूहळू लोक फ्लॅट बघायला येऊ लागले आहेत. मात्र कोणासोबत डील पक्की होऊ शकली नाही. असं देखील त्याने सांगितलं आहे.

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येमागे काय कारण होते हे अद्याप समजलेले नाही. मात्र, नैराश्‍य आल्याने त्याने आत्महत्या केली असा अंदाज आहे. तसेच सुशांतचा पोस्टमार्टम रिपोर्टमधून त्याचा मृत्यू श्‍वास गुदमरून झाल्याचे समोर आले आहे. याचाच अर्थ त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट होते. मात्र, सुशांतच्या निधनाचा तपास सध्या सीबीआयकडून केला जात आहे.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?