मुंबई, 13 नोव्हेंबर: राज्यात नुकतीचमहाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल
भरतीचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे आता रानातील तरुणांना
पोलीस होण्याचा गोल्डन चान्स मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली
आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र ही
भरती प्रक्रिया होणार तरी कशी? यासाठी परीक्षा कशी होणार त्याचं पॅटर्न कसं असणार याबद्दलचे प्रश्न
तरुणांना पडले आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या पदभरतीचं संपूर्ण परीक्षेचं
पॅटर्न सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 प्रक्रियेत दोन चाचण्या घेण्यात
येणार आहेत. यामध्ये शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी होणार आहे. सुरुवातीला
उमेदवारांची शारीरिक परीक्षा होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात
येणार आहे. या दोन्ही परीक्षांच्या पॅटर्नबद्दल जाणून घेऊया.IT Job Alert: मोठी
ई-कॉमर्स कंपनी Flipkart मध्ये बंपर ओपनिंग्स; 'या' पोस्टसाठी
Vacancyअशी असेल शारीरिक चाचणी पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक
चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र
राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठीशारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये
पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50
गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत. शारीरिक
चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात
दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असतील.खूशखबर! राज्याच्या ST महामंडळात बंपर ओपनिंग्स
आणि पात्रता फक्त 10वी; 'या' पत्त्यावर पाठवा अर्जअशी असेल लेखी परीक्षा 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी
परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड
प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी
चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न
बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत.
परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक
बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार
स्वतंत्र विभाग असतील.
विभाग नाव |
एकूण प्रश्न |
एकूण गुण |
एकूण वेळ |
गणित |
25 प्रश्न |
25 गुण |
90 मिनिट |
बौद्धिक चाचणी |
25 प्रश्न |
25 गुण |
मराठी व्याकरण |
25 प्रश्न |
25 गुण |
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी |
25 प्रश्न |
25 गुण |
एकूण |
100 प्रश्न |
100 गुण |
गडचिरोली जिल्ह्याकरिता शासन, गृहविभाग आदेशनुसार गडचिरोली
जिल्हयातील पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त १०० गुणांची
गोंडी आणि माडीया भाषेची लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागेल. गडचिरोली जिल्हयामध्ये
राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. सदर
उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला
(Residential Certificate) जोडणे आवश्यक राहील. असे उमेदवार गडचिरोली जिल्हयाच्या बाहेर
बदलीपात्र असणार नाहीत अशी माहिती अधिसूचनेनंत देण्यात आली आहे.ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी
नोकरीची बंपर लॉटरी; सेंट्रल रेल्वे मुंबईत करणार मोठी भरती; लगेच करा अप्लायचालक पदांसाठी अशी होईल चाचणी हलके मोटार वाहन चालविण्याची
चाचणी 25 गुणांची असेल आणि जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी 25 गुणांची अशी एकूण 50 गुणांची कौशल्य चाचणी द्यावी
लागेल. दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान 40 टक्के गुण मिळवून उमेदवारास
उत्तीर्ण व्हावे लागेल. कौशल्य चाचणी हो केवळ एक अहंता चाचणी असून कौशल्य चाचणीत
मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात
समाविष्ट केले जाणार नाहीत. कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात
येईल.