आज शाम मुखर्जी स्टेडियमवर अभिनेता अजय देवगण,अभिनेता सुनील शेट्टी,अभिनेता प्रभू देवा यांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे.
गोवा : 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट
महोत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे.
पुढील आठ दिवस चित्रपट प्रेमीेंना विविध
चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या
हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. यावेळी गोव्याचे राज्यपाल आणि
मुख्यमंत्र्यांसह सिनेसृष्टीतील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहे.
आजपासून सुरू होणारा हा महोत्सव 28 नोव्हेंबर चालणार
आहे. या महोत्सवात अनेक गाजलेले सिनेमे बघायला मिळणार आहेत. मराठीसह हिंदी आणि
दाक्षिणात्य सिनेमांचं खास स्क्रिनिंग असणार आहे. सिनेमाप्रेमींना आठवडाभर मनोरंजनाची
मेजवानी मिळणार आहे. या महोत्सवासाठी संपूर्ण गोवा सज्ज असून गोव्यातील अनेक शहरात
तसेच राजधानी पणजी येथे भव्य सजावट करण्यात आली आहे.
आज शाम मुखर्जी स्टेडियमवर अभिनेता अजय
देवगण,अभिनेता सुनील शेट्टी,अभिनेता प्रभू देवा यांच्या उपस्थितीत
शुभारंभ होणार आहे. आज महोत्सवाच्या सुरुवातीला अभिनेता अजय देवगनच्या बहुचर्चित 'दृश्यम 2' सिनेमाचं खास
स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे.'दृश्यम 2'सह एसएस राजामौलींचा 'आरआरआर' आणि बॉलिवूडचे
महानायक अमिताभ बच्चन यांचा 'अभिमान' हा सिनेमादेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. महोत्सावाच्या
पहिल्या दिवशी अद्वैत चौहान, गुलशन ग्रोव्हर, पियुष गुप्ता, व्ही. विजयेंद्र आणि पंकज त्रिपाठी यांच्या विशेष सत्राचे आयोजन
करण्यात आले आहे.