खाणीत तोल जाऊन पडल्याने तरुणीचा मृत्यु; कात्रज येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

 


पुणे : Pune Crime | कात्रजमधील भिलारेवाडी  परिसरात खाणीत तोल जाऊन पडल्याने तरुणीचा मृत्यू  झाल्याची घटना घडली.

ऋतिका जयवंत काळे  (वय २१, रा.भिलारेवाडी, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत ऋतिकाच्या आईने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनिल तुळशीराम महाजन  व तुळशीराम महाजन  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिलारेवाडी परिसरात खाण आहे. खाणीच्या परिसरात या भागातील रहिवाशांकडून कचरा टाकण्यात येतो. ऋतिका कचरा टाकण्यासाठी खाणीच्या परिसरात गेली होती. त्या वेळी तोल जाऊन ती खाणीत पडल्याने गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला

खाणीच्या परिसरात कठडे नसल्याने दुर्घटना घडल्याचे ऋतिकाच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे.
सुरक्षेसाठी खाणीच्या कडेला कोणतेही कंपाऊंड करणे आवश्यक असताना कोणत्याही उपाय योजना न
केल्याने तरुणीचा मृत्यु झाल्याने दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून
पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव  तपास करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..