डॉ. लागू यांच्या नावाने नाट्यगृह उभारणार


पुणे, दि. 16 -ज्येष्ठ रंगकर्मी आणि नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांच्या नावाने हिराबाग येथील महाराष्ट्र कल्चरल सेंटरमध्ये नाट्यगृह उभारण्यात येणार असल्याची घोषणा डॉ. लागू यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ. आनंद यांनी बुधवारी केली.

यावेळी लागू यांची कन्या डॉ. शुभांगी कानिटकर, “महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सचिव राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि डॉ. लागू यांचे घनिष्ट सबंध होते. त्यांचे स्मारक व्हावे, असा मानस सेंटरतर्फे लागू कुटुंबीयांकडे व्यक्त करण्यात आला. याला डॉ. लागूंचे नाव देण्यालाही लागू कुटुंबीयांनी परवानगी दिली. एवढेच नव्हे, तर 60 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचेही कबूल केले. तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कारसोहळ्यात त्यांनी त्यातील 10 लाख रुपयांचा धनादेश सेंटरचे अध्यक्ष आणि अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्याकडे सुपूर्त केला.

डॉ. लागू यांच्या नावाने 250 ते 300 आसन क्षमता असणारे नाट्यगृह उभे राहणार आहे. त्यात अद्ययावत सुविधा असणार आहेत. कलाकारांना त्यांच्या अभिव्यक्तीच्या गरजेनुसार संपूर्ण रंगमंच हव्या त्या पद्धतीने नाट्यप्रयोगासाठी वापरता येणार आहे, किंबहुना तशीच सोय या नाट्यगृहात करण्यात येणार आहे. तसेच डॉ. लागूंच्या पारितोषिकांचे, पुस्तकांचे, भाषणांचे तसेच त्यांनी बसवलेल्या नाटकांच्या संहिता या सगळ्याचे संग्रहालय याच वास्तूत उभे केले जाणार असल्याचे डॉ. आनंद यांनी नमूद केले.

यंदापासून डॉ. लागू यांच्या जन्मदिनी म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कारप्रदान केला जाणार आहे. तसेच हा पुरस्कार रूपवेध प्रतिष्ठानआणि महाराष्ट्र कल्चरल सेंटरयांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?