पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी


  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे दोन हस्तकांकडून मोदींना मारणार असल्याची ध्वनिफीत व संदेश मुंबई वाहतुक पोलिसांना व्हॉट्सअॅपद्वारे प्राप्त झाला आहे.

मुंबई वाहतुक पोलिसांच्या हेल्पलाईनवर सोमवारी एक व्हॉट्स अॅप संदेश प्राप्त झाला. त्यात सात ध्वनिफीत असून संबंधित व्यक्ती हिंदीमध्ये बोलत आहे. तसेच सुप्रभात बेज नावाचे आधार कार्डचे छायाचित्र, केरळ पोलिस संबंधित छायाचित्र नंबरवर पाठवले होते. त्यांची तपासणी केली असता संबंधित व्यक्ती दाउद इब्राहिमचे दोन हस्तक मुस्तफा अहमद व नवाज हे आहेत. आणि त्यांच्याकडून मोदींच्या हत्येचा कट केला जात असल्याचा तसेच देशात घातपात करणार असल्याच्या संभाषणात समावेश आहे.

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याच्या धमकीच्या या संदेशानंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्यांनी तात्काळ मुंबई पोलीस, गुन्हे शाखा यांना याबाबतची माहिती दिली आहे. त्यानंतर पोलीस पथकांनी एका हिरे कंपनीच्या व्यवस्थापकाची चौकशी केली असता समुप्रभात बेज नावाचा व्यक्ती काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे काम करत होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..