नाशिक जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी एक आदेश जारी करून शाळांना 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन साजरा करण्याच्या सूचना दिल्या, त्यासाठी शाळांनी विविध उपक्रमांचे आयोजन करणे अपेक्षित आहे असे सांगण्यात आले.
नाशिक
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी बीडी कनोज यांनी हा आदेश जारी केला. या आदेशात
त्यांनी म्हटले आहे की, जागतिक
शौचालय दिनानिमित्त 'स्वच्छ
शौचालय मोहीम' सुरू
करण्यात आली आहे, ज्याचा एक
भाग म्हणून इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'स्वच्छता आणि भूजल' या थीमवर स्पर्धा आणि उपक्रम
आयोजित केले जावेत. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व सरकारी शाळांतील
विद्यार्थ्यांना 'सेल्फी विथ
टॉयलेट' स्पर्धेत
सहभागी होण्याचे आदेश दिल्याने शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांचा रोष ओढवून घेतला आहे.
त्यामुळे
आता नाशिकच्या शिक्षण विभागानं काढलेल्या एका परिपत्रकाची सध्या सगळीकडे जोरदार
चर्चा होत आहे. या स्पर्धांमुळे मात्र शिक्षकांचं धाबं दणाणलं आहे. अनेक
शाळांमध्ये शौचालयांची अवस्था बिकट आहे. अशा परिस्थितीत सेल्फी काढण्यासाठी
शौचालयाची स्वच्छता करणार कोण असा प्रश्न अनेक शिक्षकांनी विचारला असून त्यांनी या
परिपत्रकाला विरोधही केला आहे.
अशा स्पर्धा
घेण्यामागील कारण काय असा प्रश्न शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी उपस्थित केला आहे.
मुलांना टॉयलेटमध्ये सेल्फी काढायला का भाग पाडत आहात? विद्यार्थ्यांना सेल्फी घेण्यास
सांगण्याऐवजी स्वच्छ स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असायला हवा, असे शिक्षकांचे मत आहे.