फेविक्विकचा वापर हत्येसाठी करणाऱ्या तांत्रिकाचा कट ऐकून हैराण व्हाल! कहाणी दुहेरी हत्याकांडाची
राजस्थान : फेविक्विकचा वापर हत्या करण्यासाठी होऊ शकतो, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण उदयपूरमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं आता यावर विश्वास ठेवायला भाग पाडलंय.
आरोपीचं
नाव भालेश कुमार असं आहे. तर ज्यांची हत्या करण्यात आली त्यांची नावं नाव राहुल
मीना आणि सोनू कुंवर असं आहे. राहुल हा पेशाने शिक्षक होता. तर सोनू ही 28 वर्षांची तरुणी होती. दोघांचे लग्नानंतरही एकमेकांशी संबंध
होते.
कशी केली हत्या?
पोलिसांनी
मृतदेहांची ओळख पटवल्यानंतर हे हत्याकांड कसं घडलं, त्याचाही छडा लावलाय. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. आरोपी
भालेश कुमार याने राहुल आणि सोनू यांनी फोन करुन एके ठिकाणी बोलावून घेतलं होतं.
त्यानंतर तो दोघांना घेऊन जंगलात गेला.
कायमस्वरुपी
जर तुम्हाला एकमेकांची साथ हवी असेल, तर मी जसं
सांगतो, तसं करा, असं तांत्रिक भालेशने राहुल आणि सोनूला सांगितलं. त्या दोघांनीही
विश्वास ठेवला आणि भालेश सांगतोय, तसं ते करत
गेले.
आधी
भालेशने दोघांना विवस्त्र होण्यास सांगितलं. दोघेही नग्न झाल्यानंतर भालेश समोरच
लैंगिक संबंध ठेवू लागले. भालेशचं ऐकूनच ते हा सगळा प्रकार करत होते. जेव्हा ते
एकमेकांच्या शरीरात गुंतले होते, तेव्हा
भालेश याने डाव साधला.
…आणि फेविक्विकचा वापर
भालेश याने
50 फेविक्विक पॅकेट्सचा साठा एका बॉटलमध्ये
जमा केला होता. हे फेविक्विक त्याने एकमेकांच्या शरीरात गुंग झालेल्या राहुल आणि
सोनू यांच्या अंगावर त्याने फेकलं. फेविक्विक फेकता क्षणी ते दोघंही एकमेकांना
चिकटले. त्यांनी वेगळं होण्याचा प्रयत्नही केला. पण त्यात त्यांची चामडीही अक्षरशः सोलली गेली.
बिथरलेले
राहुल आणि सोनू स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. धडपडत होते. पण तितक्यात
भालेश याने चाकू आणि दगडांनी दोघांवर हल्ला केला. दोघांच्या गुप्तांगावर सपासप वार
केले आणि त्यांना दगडाने ठेचलं. या हल्ल्यात राहुल आणि सोनू रक्तबंबाळ झाले आणि
जागीच त्यांचा मृत्यू झाला.
जेव्हा
जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत राहुल आणि सोनू यांचा मृतदेह आढळला तेव्हा खळबळ
उडाली. पोलिसांना कळवण्यात आलं. पोलीस आले. त्यांनी मृतदेहांची ओळख पटवली त्यानंतर
सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास केला.
उदयपूर
येथील गोंगूद येथे मजावद नावाचं गाव आहे. तिथे हे सगळं प्रकरण घडलं. याप्रकरणी
पोलिसांनी 200
हून अधिक जणांची चौकशी केली.
सीसीटीव्ही फुटेज तपासले. अखेर 52 वर्षीय
आरोपी भालेश कुमार पोलिसांच्या रडारवर आला. त्यालाही अटक करण्यात आली.
का रचलं दुहेरी हत्याकांड?
सोनू कुवर
नावाच्या मुलीवर भालेश याची नजर होती. पण राहुल याचे लग्नानंतरही सोनूसोबत अनैतिक
संबंध असल्याचं त्याला खुपत होतं. तांत्रिक असल्यानं राहुलची पत्नी एकदा भालेशकडे
आली होती. तेव्हा भालेश याने तिला राहुल आणि सोनूचे संबंध आहे, हे सांगून टाकलं होतं.
त्यानंतर
भालेश सोनूशी संबंध वाढण्याच्या प्रयत्नात होता. पण राहुल आणि सोनू यांच्या ही
गोष्ट लक्षात आली. त्यांनी भालेश याला थेट इशाराच दिला. अनेक वर्ष तांत्रिकाचं काम
करुन भालेशने नाव कमावलं होतं. पण त्याचा सगळा भांडाफोड करुन बदनाम करण्याची धमकी
राहुल आणि सोनू यांनी दिल्यानंतर भालेश घाबरुन गेला. घाबरलेल्या भालेश याने अखेर
राहुल आणि सोनू यांच्या हत्येचा कट रचला आणि त्यासाठीच त्याने फेविक्विक
वापरण्याचा प्लान आखला होता.
Comments
Post a Comment