'दीया और बाती हम' फेम अभिनेत्रीची प्रेमात फसवणूक, लिव्ह इनमध्ये अशी परिस्थिती

 


मुंबई : 'दीया और बाती हम' ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं त्यांच्या अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली.

या मालिकेतील अभिनेत्री कनिष्का सोनी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कनिष्कानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रद्धा हत्याकांडाच्या बऱ्याच गोष्टी तिच्यासोबत घडल्याचे तिने म्हटले आहे. मृत्यूपूर्वी श्रद्धासोबत जे काही घडलं ते सर्व स्वतः देखील तिनं अनुभवलं आहे. कनिष्काने स्वतःचा रडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामध्ये तिनं सांगितलं की, श्रद्धाच्या मृत्यूनं तिला खूप दु:ख झाले आहे. कनिष्काने नाव न सांगता एका अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत.

कनिष्क लिव्ह-इनमध्ये राहू लागली तेव्हा काय झालं?

कनिष्कानं व्हिडिओमध्ये म्हटले की ती श्रद्धाच्या कथेचे तिच्या आयुष्याशी साम्य आहे, एका अभिनेत्यानं तिला प्रपोज केलं होतं आणि तिच्याशी लग्न करण्यास सांगितलं होतं. कनिष्कानं सांगितले की, त्या अभिनेत्याच्या सवयी वाईट होत्या आणि तो हिंसक स्वभावाचा होता. इतकंच नाही तर तो दारू प्यायचा आणि रागाच्या भरात काहीही करायचा.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..