सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दु:खाचा डोंगर, आईनंतर दोन महिन्यात वडिलांचही निधन.

 


कृष्णा घट्टामनेनी यांची पत्नी म्हणजेच महेश बाबूच्या आईचे दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. या धक्क्यातून ते अद्याप सावरले नव्हते. दरम्यान 14 नोव्हेंबरला त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना कॉन्टिनेंटल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

हैदराबाद : साऊथचा सुपरस्टार महेश बाबूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दोन महिण्यापुर्वी आईला गमावल्यानंतर आता महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टमनेनी  यांचं आज सकाळी निधन झालं. एक दिवसापूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना हैदराबाद येथील कॉन्टिनेंटल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज पहाटे वयाच्या 79 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हे सुद्धा वाचा

कृष्णा घट्टामनेनी यांची पत्नी म्हणजेच महेश बाबूच्या आईचे दोन महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. या धक्क्यातून ते अद्याप सावरले नव्हते. दरम्यान 14 नोव्हेंबरला त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना कॉन्टिनेंटल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून शोक व्यक्त

कृष्णा घट्टामनेनी यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. तसेच तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.

350 हून अधिक चित्रपटांमध्ये केलं काम

सुपरस्टार कृष्णाच यांच पूर्ण नाव घटामनेनी शिव राम कृष्ण मूर्ती होते.त्यांचा जन्म 31 मे 1943 रोजी झाला.त्यांचे वडील घटामनेनी राघवैय्या चौधरी आणि आई नागरथनम्मा.कृष्णा या नावाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत त्यांना ओळखल्या जायचे. त्यांनीपाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..