पुणे-बंगळुरू 100 किमी होणार कमी


 पुणे, दि. 20 -पुणे -बंगळुरू 'ग्रीन कॅरिडोअर'ची प्राथमिक आखणी पूर्ण झाली आहे.

 त्यानुसार पुणे-बंगळुरू अंतर 100 किलोमीटरने कमी होणार आहे. तर प्रवासाच्या वेळेत सुमारे दोन तासांची बचत होणार आहे.

केंद्र सरकारने भारतमाला प्रकल्पांतर्गत पुणे-औरंगाबाद आणि पुणे -बंगळुरू या दोन ग्रीन कॅरिडोअर प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी पुणे-औरंगाबाद ग्रीन कॅरिडोअरसाठी सल्लागार नेमण्यात आला असून, त्यांच्याकडून प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू देखील झाले आहे. त्यापाठोपाठ पुणे-बंगळुरू ग्रीन कॅरिडोअरसाठी देखील सल्लागार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्या सल्लागार कंपनीकडून प्राथमिक मार्गाची आखणी पूर्ण करण्यात आली आहे. लवकरच त्यास मान्यता देऊन डीपीआरतयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पुणे-बंगळुरू हे अंतर सुमारे 850 किलोमीटर आहे. नव्याने तयार करण्यात येणाऱ्या ग्रीन कॅरिडोअरमुळे हे अंतर शंभर किलोमीटरने कमी होऊन 750 किलोमीटर होणार आहे. सध्या प्रवासासाठी दहा ते बारा तास लागतात. नव्या मार्गामुळे वेळेतही बचत होणार असून आठ ते नऊ तासांमध्ये बंगळुरूला जाणे शक्‍य होणार आहे.
हा ग्रीन कॅरिडोअर शंभर मीटर रुंदीचा आणि सहा पदरी असणार आहे. ताशी 80 ते 100 किलोमीटरचा वेग असणार आहे. दोन ते तीन महिन्यांत डीपीआरचे काम पूर्ण करण्याचे बंधन सल्लागार कंपनीला घालण्यात आले आहे.

सर्वेक्षणाचे काम सुरू
सध्या अस्तित्वात असलेल्या पुणे-बंगळुरू मार्गापेक्षा हा मार्ग पूर्णत: वेगळा असणार आहे. प्राथमिक मार्गाची आखणी पूर्ण झाली असून, सध्या प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि महिती जमा करण्याचे काम सुरू झाले आहे.

 

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.