स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पिसर्वे ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय

 *स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पिसर्वे येथे विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय



पुरंदर तालुक्यातील पिसर्वे येथे आज एक विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेमध्ये परंपरेने चालत आलेली अनिष्ठ विधवा प्रथा मोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय ... पिसर्वे गावचे सरपंच सरपंच बाळासाहेब कोलते यांचा अध्यक्षते खाली ही सभा पारपडली . यावेळी उपसरपंच मीना कोलते, माजी उपसरपंच अरुणा कोलते, सदस्य रविंद्र कोलते, महेश वाघमारे, चंद्रकांत कोलते, सुनिल कोलते, योगिता कोलते, कविता कोलते, सुषमा कटके,शितल कोलते यांच्यासह ग्रामसेवक अमित टिळेकर, माजी सरपंच संभाजी कोलते, नवनियुक्त तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश कोलते आदींसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           आम्ही संवादी या संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत लक्ष्मीशंकर यांनी उपस्थित गावकाऱ्यांसह महिलांना ही प्रथा बंद करण्यामागची कारणे व गरज याबाबत प्रबोधन केले. पिसर्वे ग्रामपंचायतीचा इतिहासातील या ग्रामसभेला पहिल्यांदाच महिला वर्गाने व गावकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. सरपंच बाळासाहेब कोलते यांनी मांडलेला ठराव व सदस्या योगिता कोलते यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व गावकऱ्यांनी हात उंचावत विधवा प्रथा मोडण्याचा ठरावाला संमती दिली.

          *दरम्यान हा ठराव बहुमताने मंजूर झाल्यानंतर उपस्थित सर्व विधवा महिलांना गावातील जेष्ठ नेते श्रीरंग वायकर व ग्रामपंचायतीच्या वतीने हळदी-कुंकू, बांगड्या, व साडीचोळी देऊन सन्मानीत करण्यात आलय...

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?