Type Here to Get Search Results !

नीरा येथे विद्यार्थ्यांसमोर करण्यात आली कराटेची चित्त थरारक प्रात्यक्षिके

  नीरा येथे विद्यार्थ्यांसमोर करण्यात आली कराटेची चित्त थरारक प्रात्यक्षिके




नीरा दि.३


  नीरा ता.पुरंदर येथे आयडियल तायक्वांदो कराटे किक बॉक्सिंग असोसिएशनच्यावतीने महिला सक्षमीकरणासाठी  मुलींनी स्वसंरक्षण कसे करावे.याची माहिती होण्यासाठी कराटेची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. यामध्ये मुले व मुली यांनी सहभाग घेतला.


 महात्मा गांधी विद्यालयातपार पडलेल्या या प्रात्यक्षिका मध्ये मुलींनी सुद्धा आपले कौशल्य दाखवले  यावेळी महात्मा गांधी विद्यालयाची मुले तसेच सौ. लीलावती रिकवलाल शहा कन्या शाळेच्या मुली त्याच बरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रात्यक्षिकामध्ये कराटे मध्ये योगासनाच्या वापरामुळे शारीरिक लवचिकता कशी निर्माण होते ? हे दाखवण्यात आले. शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणे ही काळाची गरज बनली आहे तरी सर्वांनी व्यायाम करावा असे आवाहन प्रशिक्षक अजित सोनावणे यांनी  यावेळी केले.त्याचबरोबर शरीरात मजबुती कशी निर्माण होते. हे विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून दाखवून दिले. यामध्ये हाताने कौल फोडणे, पायाने विशिष्ट उंचीवरचे कौल फोडणे, त्याचबरोबर पोटावरून गाडी कशा पद्धतीने जाते आणि स्वतः फिटनेस मुलं कसे करतात याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मुलींना स्वसंरक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात आले. संस्थेचे ग्रँडमास्टर संजय सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रात्यक्षिके पार पडली





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies