Type Here to Get Search Results !

तैवान वरुन चीन आणि आमेतिकेत तणाव वाढला : कधीही पडूनशकते युद्धाची ठिणगी.

 

पुणे दि.३

    चीनने दिलेला गंभीर परिणामांचा इशारा धुडकावून अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी मंगळवारी तैवानमध्ये दाखल झाल्या. सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावरून चीनने पेलोसी यांच्या तैवान दौऱ्याला विरोध केला होता. 'याची जबर किंमत अमेरिकेला चुकवावी लागेल,' असेही चीनने म्हटले होते. मात्र, त्यानंतरही पेलोसी मलेशियातून तैवानला पोहोचल्या. तैवानमध्ये पाऊल ठेवलेल्या २५ वर्षांतील त्या पहिल्याच उच्चपदस्थ अमेरिकन राजकीय नेत्या ठरल्या आहेत.



पेलोसी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीनने शियामेन शहराच्या बाजूने पूर्व किनाऱ्याकडील हवाई क्षेत्र बंद केले होते. मात्र, अमेरिकी हवाई दलाच्या विमानाने पेलोसी शिष्टमंडळासह तैपेई विमानतळावर दाखल झाल्या. या दरम्यान चीनच्या एसयू-३५ लढाऊ विमानांनी तैवानची सामुद्रधुनी ओलांडल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले. तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू त्यांच्या स्वागतासाठी विमातळावर उपस्थित होते. तैपेईतील सर्वांत उंच इमारतीवर पेलोसी यांच्या स्वागतासाठी रोषणाई करण्यात आली होती. पेलोसी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तैवानच्या पूर्वेकडील समुद्रात अमेरिकेने चार युद्धनौका तैनात केल्या आहेत. मात्र, ही नियमित सागरी तैनात असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. पेलोसी यांच्या दौऱ्याबद्दल तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिलेली नाही. 'तैवानला येणे लोकशाहीसाठीच्या आमच्या कटिबद्धतेचे निदर्शक आहे. तैवान आणि सर्व लोकशाही संस्थांच्या स्वातंत्र्यांचा आदर झाला पाहिजे,' असेही पेलोसी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. चीन तैवानला आपला अविभाज्य भाग मानतो. त्यामुळे तेथील अमेरिकेच्या हस्तक्षेपाचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा चीनने दिला होता. अमेरिकेचे तैवानसोबत अधिकृत राजनैतिक संबंध नाहीत. मात्र, तैवानला स्वत:च्या रक्षणासाठी मदत करीत असल्याचे अमेरिकेने म्हटले होते.


दरम्यान, नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम होणार असून, पेलोसी यांच्या कृतीमुळे प्रादेशिक शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण झाला आहे, असे चीनने म्हटले आहे. पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दांत निवेदन जारी केले आहे. पेलोसी यांच्या तैवान भेटीमुळे 'एक चीन तत्त्वा'चे आणि चीन व अमेरिकेच्या तीन संयुक्त निवेदनांचे गंभीर उल्लंघन झाले आहे, असे चीनने म्हटले आहे. 'पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे चीन-अमेरिका संबंधांच्या पायावर गंभीर परिणाम झाला आहे. चीनचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मतेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे तैवानच्या सामुद्रधुनीतील शांतता आणि स्थैर्यावर गंभीर परिणाम झाला आहे. तैवानच्या फुटीरतावाद्यांना यामुळे चुकीचा संदेश गेला आहे. चीन या कृतीचा निषेध करीत आहे,' असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

तैवानच्या सव्वा दोन कोटी नागरिकांसोबत अमेरिकेची एकजूट असून, लोकशाही आणि एकाधिकारशाही यातून एकाची निवड करण्याच्या काळात हे महत्त्वाचे आहे. - नॅन्सी पेलोसी, सभापती, अमेरिकी प्रतिनिधीगृह

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies