केतकी चितळेचा जेल मुक्काम वाढला, आजही जामीन अर्ज फेटाळला

 केतकी चितळेचा जेल मुक्काम वाढला, आजही जामीन अर्ज फेटाळला

 


मुंबई  दि.२६

अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर कळवा पोलिस स्टेशन अंतर्गत दाखल  गुन्ह्यात तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे कळवा पोलिसांत केतकीवर गुन्हा दाखल झाला आहे. अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याचे कारण देवून ठाणे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला  आहे. तसेच रबाळे पोलिस स्टेशन अंतर्गत अॅट्रोसिटी प्रकरणी जामिनाबाबत अद्याप पोलिसांचा जबाब येणे बाकी आहे. सध्या केतकी चितळे ही ठाणे न्यायालयीन कोठडीत म्हणजे ठाणे कारागृहात आहे. या काही आक्षेपार्ह पोस्टमुळे गेल्या अनेक दिवासांपासून अभिनेत्री केतकी चितळे ही वादात सापडली आहे. केतकीवर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

केतकीविरोधात महाराष्ट्रभर गुन्हे दाखल

गेल्या काही दिवसांत केतकी चितळेविरोधात जवळपास राज्यभर गुन्हे दाखल झाली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी तिच्यावर जवळपास २०  ठिकाणांहून जास्तठिकाणी  गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र फक्त याच प्रकरणात नाही तर केतकी चितळेविरोधात आणखीही काही वादग्रस्त पोस्टच्या प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आता केतकीच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. त्याही प्रकरणात पोलीस केतकीला आता ताब्यात घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाणे पोलिसांनंतर एका अॅट्रोसिटीच्या प्रकरणात केतकीचा ताबा रबाळे पोलिसांनी घेतला होता. त्यामुळे आता पुढेही इतर पोलीस तिचा ताबा घेण्याची शक्यता आहे.

केतकी चितळेची जेलवारी कधी संपणार?

आता कोर्टाने केतकीला आणखी एक दणका देत जामीन फेटाळल्यामुळे तिचा पाय आणखी खोलात गेला आहे. त्यामुळे केतकीला आणखी किती दिवस जेलमध्ये काढावे लागणार? या प्रकरणात आणि इतर प्रकरणातून केतकीची जेलवारी कधी संपणार? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. तुर्तास तरी तिची जेलवारी टळताना दिसत नाही.

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.