पोंढे येथे महिलेचा विनयभंग प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल.

 पोंढे येथे महिलेचा विनयभंग प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद दाखल.



जेजुरी दि.१


  पुरंदर तालुक्यातील पोंढे येथे महीलेच्याघरासमोर येवून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद देण्यात आले आहे याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम  ३५४(अ) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल.केला आहे.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,

 या संदर्भात पोंढे येथे राहणाऱ्या महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे.तिने दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक ३० मे व ३१ मे रोजी आरोपी आकाश मुरलीधर वाघले अंदाजे वय २२ वर्ष रा.पोंढे तालुका पुरंदर जिल्हा पुणे हा या महिलेच्या घरा समोर येऊनघरी  ती एकटी असताना व तिचे पती घरी नसताना आकाश मुरलीधर वाघले हा त्याचे मोटरसायकलवर तिच्या घरा समोर येऊन त्याच्या मोटर सायकलची रेस वाढवून हॉर्न वाजवून वाईट नजरेने तिच्याकडे पाहून हातवारे केले. त्यावेळी ती  व  शेजारील महिलांनी त्यास तो असे वाईट भावनेने हातवारे का करतोस असे विचारले असता तो घरा समोरून निघून गेला. तसेच यापूर्वीसुद्धा हिंमहीला  शेतात एकटीच येत असताना व  शेतात एकटी काम करीत असताना तिचे जवळून मोटरसायकलवर जात असताना मोठ्या आवाजात रेस करून मोठ्याने हॉर्न वाजवुन तिच्याकडे वाईट भावनेने पाहत असे. म्हणून तिने फिर्याद दिली आहे याबाबत दिनांक ३१ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबत अधिकचा तपास करीत आहेत.




Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..