Wednesday, May 18, 2022

पिंगोरी ग्रामपंचायतीस मिळणार नवीन ग्रामसचीवालय

 पिंगोरी ग्रामपंचायतीस मिळणार नवीन ग्रामसचीवालय 

निवडणूकी मध्ये दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यात ग्रामपंचायत सदस्यांना यश.



नीरा. दि.१८

      पिंगोरी (ता.पुरंदर) येथील ग्रामपंचायतीसाठी आता नव्याने इमारत बांधण्यात येणार आहे.त्यामुळे पिंगोरी ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण होणार आहे.याबाबतच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून १५ लक्ष रुपयाचा निधी मिळणार आहे.


    पिंगोरी ग्रामपंचायतीची जुनी इमारत मोडकळीस आल्याने त्या ठिकाणी नवीन इमारत बांधावी अशी मागणी पिंगोरी ग्रामस्थ अनेक वर्षा पासून करीत आहेत. इमारत खराब असल्याने ग्रामपंचायत कारभार करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे.मात्र आता आर.आर. (आबा) पाटील ग्रामसचिवालय या योजने अंतर्गत १५ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती पिंगोरीचे सरपंच जीवन शिंदे व उपसरपंच प्रकाश शिंदे यांनी दिली आहे .या बाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सरचिटणीस म्हणाले की,खा.सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने पिंगोरी ग्रामांचायातीच्या इमारतीसाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.लवकरच इमारत पूर्ण होणार असल्याने व ग्रामपंचायत निवडनुकित दिलेल्या आश्वासनं पैकी एक आश्वासन लवकरच सुरू होत असल्याबद्दल प्रमुख आणि पैकी रुपेश यादव व सचिन शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured Post

महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर, राजकीय हालचालींना वेग

एस. प्रशांत पुणे : राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घडामोड समोर आली असून, महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी ...