२३ मे रोजी सासवड येथे भाजपाच्या वतीने जनआक्रोश आंदोलन ...गुंजवणी महावितरण या विषयावर भाष्य
सासवड (प्रतिनिधी) ः पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांचे होत असलेल्या पिळवणुकी बाबत भारतीय जनता पार्टी पुरंदरचे वतीने 'जनआक्रोश आंदोलन'' २३ मे रोजी सकाळी १० वाजता पुरंदर तहसील कार्यालय येथे करणार असल्याची माहिती भाजपाचे तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी दिली.
भारतीय जनता पार्टी पुरंदर तालुका वतीने विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार विजय काळे, किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष जालिंदर कामठे, युवानेते बाबाराजे जाधवराव माजी जिल्हा आध्यक्ष गणेश भेगडे, सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खांडरे, यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन होणार आहे.
पुरंदर तालुक्यात शेतक-यांची मोठ्या प्रमाणात पिळवणुक चालु आहे. महाविकास आघाडी सत्तेत असल्यामुळे विद्यमान लोक प्रतिनिधी या जनतेच्या समस्यावर डोळेझाक करत आहेत. त्यापैकी प्रामुख्याने विद्युत पारेषन कंपनीकडुन बेकायदेशीर पणे ( पिसर्वे, धालेवाडी, कोथळे, भोसलेवाडी, राजेवाडी, व इतर ) जागेवर टावर उभारणे कामी बेकायदेशीर पणे प्रशासनाला हाताशी धरून काम काज करीत आहे.
पुरंदर उपसा जलसिंचन योजनामध्ये मोठ्या प्रमाणात भाववाढ करून त्याप्रमाणे भाववाढ केलेल्या पैश्याचा कोणताही हिशोब न देता बेकायदेशीर पणे रक्कम गोळा केली जात आहे. याची चौकशी व्हावी.
पुरंदर तालुक्यातील सहकारी सोसायटी यांचेकडुन कर्ज माफीस तसेच प्रोत्साहन निधी वाटप बाबत साशंकता निर्माण होत आहे. विद्युत विज वितरण कंपनीकडुन घरातील व शेतातील बिले हे अवाजवी दराने आकारणी करून त्याप्रमाणे वसुली केली जाते. आसे भारतीय जनता पार्टीचे पुरंदर तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांनी सांगितले