पिंगोरी येथील कळ्यामातीतील कुस्ती स्पर्धेत ४५ नामवंत मल्लांनी घेतला सहभाग
कुस्ती स्पर्धेचेने झाली माता वाघेश्र्वरी देवीच्या यात्रेची सांगता.
नीरा दि.१७
पिंगोरी ता.पुरंदर येथील वाघेश्र्वरी देवीची यात्रा उत्साहात संपन्न झाली. यावेळी झालेल्या पारंपरिक कळ्यामाती मधील कुस्ती स्पर्ध्ये मध्ये ४५ नामवंत मल्लांनी सहभाग घेतला.
पिंगोरी येथे दरवर्षी देवीच्या यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा भरवण्यात येतात.या ठिकाणी निकाली कुस्त्यांचा आखाडा भरत असल्याने अनेक कुस्ती शौकीन व मल्ल या स्पर्धेसाठी येत असतात.यावर्षी सुध्धा अनेक पैलवान आखाड्यात उतरले होते. चार तास रंगलेल्या या कुस्ती आखाड्यात इतर मल्लांसमावेत पुणे सातारा व मुंबई येथील ४५ नामवंत मल्लांनी सहभाग घेत कुस्तीचा खेळ दाखवला. या स्पर्धेत दोन महिला मल्लांनी देखील सहभाग घेतला.याबाबतची माहिती पोलीस पाटील राहुल शिंदे यांनी दिली. देवस्थान कमिटीच्यावतीने कमितीचे सदस्य,निलेश शिंदे,प्रवीण शिंदे,वसंत शिंदे,सरपंच जीवन शिंदे,उपसरपंच प्रकाश शिंदे,यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.