Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या येणार पुरंदरच्या दौऱ्यावर

 उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या येणार पुरंदरच्या दौऱ्यावर




सासवड  दि.८


      पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने खानवडी (ता. पुरंदर) येथे उभारण्यात येत असलेल्या ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूलसाठी मंजूर झालेल्या १२ एकर जागेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता भूमिपूजन  होणार असल्याची माहिती पुरंदर आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.

      या कार्यक्रमासाठी खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख कंपनीचे अध्यक्ष रवि गोगया, वरिष्ठ अधिकारी राकेश परवेज हे उपस्थित राहणार आहेत. आमदार संजय जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितले की  खानवडीतील मुलींची निवासी शाळा सुरू करण्यात येणार आहे. या शाळेला क्रांतीज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूल असे नाव देण्यात आले आहे. या शाळेत इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे इंग्रजी माध्यमाचे वर्ग असणार आहेत. सुरुवातीला ३०० विद्यार्थ्यांची क्षमता व कालांतराने दोन हजार विद्यार्थी  असतील. 

    राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये खानवडी शाळेसाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .असे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदामराव इंगळे यांनी सांगितले. तर या शाळेमध्ये वंचित घटकांना त्याचबरोबर स्थानिकांना देखील प्राधान्य असेल. या शाळेत विद्यार्थ्यांचे स्किल डेव्हलपमेंट साठी देखील नवीन कोर्सेस उपलब्ध असणार आहेत.

   ही शाळा परदेशी शाळेप्रमाणे डिझाईन करण्यात आली असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरुंगे यांनी दिली. 


 यावेळी कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी अध्यक्ष विजयराव कोलते, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरुंगे, गटविकास अधिकारी अमर माने, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, गणेश जगताप, संभाजी जगताप, अनिल उरवणे आदी उपस्थित होते.   


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies