पिंगोरीच्या सरपंचपदी जीवन शिंदे बिनविरोध निवड
वाल्हे. दि.२९
पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी आज जीवन शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.आज झालेल्या निवडणुकीत जीवन शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
पिंगोरी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. यामध्ये जीवन शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद लाखे यांनी जाहीर केले.त्यांना ग्रामसेवक अनिल हिरसकर यांनी सहाय्य केले.
यावेळी उपसरपंच प्रकाश शिंदे,संदीप यादव, भाग्यश्री शिंदे सुषमा भोसले, इत्यादी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.दोन सदस्य अनुउपस्थित होते.
पिंगोरी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर सरपंचपद रिक्त ठेवण्यात आले होते.यानंतर उपसरपंचपदी प्रकाश शिंदे यांची निवड करून अतिरिक्त पदभार देण्यात आला .आज शासनाच्या आदेश नुसार सरपंचपद खुल्या वर्गासाठी ठेवण्यात आल्याने शिवसेना - राष्ट्रवादी आघाडीचे जीवन शिंदे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली . पिंगोरी ग्रामपंचायती मध्ये सध्या शिवसेना व राष्ट्रवादी एकत्र असून प्रकाश शिदे उपसरपंच आहेत.
निवडी नंतर उपसरपंच प्रकाश शिंदे,पोलीस पाटील राहुल शिंदे व ग्रामस्थांच्यावतीने जीवन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पॅनल प्रमुख निलेश शिंदे,रुपेश यादव,सचिन शिंदे, सह पोपट शिंदे, कल्याण शिंदे, अजय शिंदे,प्रवीण गायकवाड,धनंजय यादव,अक्षय चव्हाण अजित गायकवाड, सागर यादव, ठकसेन भोसले,अशोक शिंदे, महेश शिंदे, रोहन ताकवले, ऋषी शिंदे.इत्यादी सह ग्रामस्थ उपस्थित होते.