शरद पवार आणि उद्भव ठाकरे यांच्यात काय झाली चर्चा.? गूढ वाढले...

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये दीड तासापेक्षा अधिक काळ चर्चा



मुंबई दि.२९


राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून विविध मुद्द्यावरून वातावरण गढूळ झालेले असतानाच आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एक बैठक पार पडली. साधारणपणे एक तासापेक्षा जास्त वेळ चर्चा झाली त्यामुळे राज्यभरात या चर्चेविषयी चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळते आहे.

         या बैठकीमध्ये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगितले जाते राज्यामध्ये हनुमान चालीसा, भोंगे आणि राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबाद येथे होणारी सभा यामुळे वातावरण तंग झाले आहे. कायदा व सुव्यवस्थेची बाजू व्यवस्थित हाताळने हे राज्य सरकारपुढे मोठे आव्हान आहे. त्यामुळे या विषयावर शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना कोणता कानमंत्र दिला? हे आगामी काळच सांगून देईल. मात्र तत्पूर्वीच या बैठकीबाबत राज्यभरात वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेला उधाण आल्याचे पाहायला मिळते आहे.

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.