भाऊचामळा सोसायटीच्या चेअरमनपदी विलास थोपटे, व्हाइस चेअरमनपदी चंद्रकांत थोपटे.
नीरा : दि.३०
पुरंदर तालुक्यातील ऊस बागायती गाव असलेल्या पिंपरे (खुर्द) येथील भाऊचामळा सोसायटीच्या चेअरमनपदी भैरवनाथ सहकर विकास पँनलचे बिनविरोध निवडून आलेले विलास थोपटे, तर चंद्रकांत थोपटे यांची व्हाइस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर सोसायटी कार्यालयासमोर फटाके वजवून गुलालाची उधळण करण्यात आली.
नीरा येथील सोसायटी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी सुनील जगताप यांनी निवडणूक प्रक्रिया पारपाडली. निर्धारित वेळेत चेअरमनपदासाठी विलास थोपटे व व्हाईसचेअरमन पदासाठी चंद्रकात थोपटे यांचा एकमेव अर्ज आल्याने दोघांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. जगताप यांना सचिव मचिंद्र लकडे यांनी सहकार्य केले.
पिंपरे (खुर्द) येथील भाऊचामळा विविध कार्यकारी सोसायटीची निवडणुकीक चुरशी होणार असल्याने कोणत्या पँनलचे उमेदवार निवडून येणार याकडे नीरा पंचक्रोशीतील लोकांचे लक्ष लागले होते. मात्र अखेरच्या टप्प्यात सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक दिलिप थोपटे यांच्या भैरवनाथ सहकर विकास पँनलने बाजी मारली. सहकर विकास पँनलचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध आले होते. रविवारी झालेल्या प्रत्यक्ष निवडणुकीत सहकर विकास पँनलचे नऊ उमेदवार बहुमताने निवडून तर सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक विजय थोपटे यांच्या भैरवनाथ सहकारी परिवर्तन पँनलचा एक उमेदवार निवडून आला. यानंतर आज दिनांक ३० एप्रिल रोजी झालेल्या चेअरमन पदाच्या निवडणुकीत विलास थोपटे चेअरमन पदी निवड करण्यात आली.