Friday, April 29, 2022

वाल्हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अंजली कुमठेकर यांची निवड

 वाल्हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अंजली कुमठेकर यांची निवड  



वाल्हे (दि.२७) पुरंदर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची असणा-यां वाल्हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य अंजली दिपक कुमठेकर  यांची बिनविरोध निवड झाली.

 

 माजी उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या जागेवर बुधवार (दि.२७) निवडणुक घेण्यात आली. सरपंच अमोल खवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत, उपसरपंचपदासाठी अंजली कुमठेकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने, बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडूक अधिकारी बबनराव चखाले यांनी जाहिर केले. 

 

अंजली कुमठेकर या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये विक्रमी मताने निवडून आलेले असूनवाल्हे ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या मध्ये त्या जेष्ठ सदस्या आहेत.  अंजली कुमठेकर यांच्या निवडीनंतर, सरपंच अमोल खवले, माजी सरपंच दत्तात्रय पवार यांचा सत्कार करण्यात आला. 

 

यावेळी, माजी उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे, सूर्यकांत भुजबळ, पोपट पवार, उद्योजक सुनिल पवार, तंटामुक्ति अध्यक्ष समदास भुजबळ, सत्यवान सुर्यवंशी,सुकलवाडी तंटामुक्ती अध्यक्ष नारायण पवार, वाल्मिकी सोसायटीचे व्हॉईस चेअरमन जयवंत भुजबळ, प्रा.अनिल भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते अमोल भुजबळ, तानाजी भुजबळ, सुजित राऊत, अनिल भुजबळ, शिरीष नवले तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

 

दरम्यान, वाल्हे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अंजली कुमठेकर यांची बिनविरोध झाल्याबद्दल, पुरंदर- हवेलीचे आमदार संजय जगताप, पुणे

जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, प्रा. संतोष नवले, प्रा. अनिल भुजबळ आदींनी अभिनंदन केले.

 

निवडीनंतर उपस्थित मान्यवरांचे आभार नवनिर्वाचित उपसरपंच अंजली कुमठेकर यांनी मानले

No comments:

Post a Comment

Featured Post

निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.

 निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.  पुरंदर :       पुरंदर तालुक्यातील निरा कोळविहीरे जिल्हा परिषद ...