वाल्हे येथील कुस्ती आखाड्यात १०० पैलवानांचा सहभाग.

 वाल्हे येथील कुस्ती आखाड्यात १००  पैलवानांचा सहभाग.



वाल्हे (दि.२७) वाल्हे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्राच्या शेवटच्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा चांगलाच रंगला.

 पुरंदर तालुक्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो पहिलवान यांनी हजेरी लावली होती. 

आखाड्यातील पुरंदर केसरी विजेत्यासह,  मुलींच्या कुस्त्या लक्षवेधक ठरल्या. कुस्ती आखाड्यामध्ये जवळपास १०० मल्लांच्या लढती झाल्या.

वाल्हे येथील श्री भैरवनाथ चैत्री उत्सवानिमित्त सहा दिवशीय यात्रा उत्सवाचे आयोजन केले जाते. 

कुस्ती आखाड्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ यात्रा कमिटीचे अध्यक्ष साहेबराव पवार, वाल्हे गावचे पाटील गिरीश पवार, सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते करण्यात आले.


 याप्रसंगी, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदेश शिर्के, उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, माजी सरपंच महादेव मंदिर, माजी उपसरपंच सुर्यकांत भुजबळ, सुर्यकांत पवार, आडाचीवाडी सरपंच दत्तात्रेय पवार, उद्योजक गोरख कदम,  राहुल यादव, प्रविण कुमठेकर, बाळासाहेब राऊत, प्रा. संतोष नवले, वाल्मिकी सोसायटीचे चेअरमन मदन भुजबळ, उपाध्यक्ष जयवंत भुजबळ आदिंसह ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कुस्ती स्पर्धेला परिसरातील कुस्ती शौकियांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती. सायंकाळी पाच ते सव्वासात दरम्यान कुस्त्यांचा आखाडा झाला. कुस्तीसाठी ६ महिला 

 कुस्तीगीर यांच्यासह, शिवरी,  सासवड, परिंचे, वानेवाडी, मांडकी, 

बारामती, पिंपरी, भोंगवली, खंडाळा, पांगारे, सोमेश्वर, मुरूम, पिसर्वे, रावडी अशा मोठ्या ठिकाणच्या मल्लांनी आखाड्यात सहभाग घेऊन खेळाचे प्रदर्शन दाखविले.

 आखाड्यामध्ये शंभर रूपयांपासून ते सत्तावीस हजार रूपयांपर्यंत रोख बक्षिसे विजेत्या पहिलवानांना देण्यात आली. यावेळी कुस्तीच्या आखाड्या  मध्ये पुरंदर तालुक्यासह इतर तालुक्यातील ही पहिलवान सहभागी झाले होते. यामध्ये एकूण १ लाख ८७ हजार रुपयांचे किंमतीच्या एकूण कुस्ती लावण्यात आल्या. 


आखाडा यशस्वी होण्यासाठी, प्रताप पवार, वाल्हे गावचे पाटील गिरीश पवार, सचिव शशिकांत दाते, शिवाजी पवार, शंकर पवार, बजरंग पवार, हनुमंत पवार, पुंडलिक भुजबळ, अरुण पवार आदींनी परिश्रम घेतले. 


जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली, वाल्हे पोलिस दुरक्षेत्राचे हवालदार केशव जगताप, संतोष मदने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..