विवाह समारंभात चोरट्यांनी 3,60,000 रुपयाचे दागिने केले लंपास

  विवाह समारंभात चोरट्यांनी 3,60,000 रुपयाचे दागिने केले लंपास

 


सासवड दि.२७

        पुरंदर तालुक्यातील सासवड  नजीक असलेल्या जाधवगड येथील लग्न समारंभात चोरट्यांनी तब्बल 3,60,000 रुपयाचे दागिने व भेट वस्तूंवर हात साफ केला आहे. घटनेनंतर आठ दिवसानंतर सासवड पोलिसात संशयइतांच्या विरोधात सासवड पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसानी भारतीय दंड विधान कलम   37934 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

      याबाबत सासवड पोलिसानी दिलेली माहिती अशी कि, या संदर्भात फिर्याद पिंपळे गुरव पुणे येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय महिला आलका सुरेश खाडे यांनी दिली आहे. यामध्ये त्यांनी विवाह समारंभात मेकअप करण्यासाठी आलेल्या तीन मुलींवर संशय व्यक्त केला आहे .

   यामध्ये त्यांचे 1,35,000 रू किमतीची  तीने तोळे वजनाची सोन्याची मोहन माळ

 40,000 रू किमतीचे  एक तोळा वजनाचे कानातील एक झुमके, 75,000 रुपये  रोख रक्कम  1,10,000/रू किमतीचे  टायटन कंपनीचे कपंनीचे घड्याळ,  10,000 रू किंमतीचे 1 घडयाळ, डी डब्लु कंपनीचे 25,000 रू किमतीचे 1 घडयाळ , रॅडो कंपनीचे 75,000 रू किंमतीचे1  घडयाळ असा 3,60,000रू  किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. दिनांक  १७ एप्रिल रोजी सासवड नजीक असलेल्या जाधव गड येथे हा विवाह सोहळा संपन्न झाला होता. यानंतर दिनाक २६ एप्रिल रोजी सासवड पोलिसात फिर्याद देण्यात आली असून सासवड पोलीस याबाबतचा तपास करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..