*श्री क्षेत्र वीर येथे बहु प्रतीक्षित PMPML बस सेवेचा शुभारंभ* ....
श्री क्षेत्र वीर येथे भाविकांच्या खास आग्रहास्तव व ग्रामस्थांच्या मागणीनुसार श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट व ग्राम पंचायत वीर यांच्या अथक प्रयत्नांमुळे व नाथ महाराजांच्या कृपेने पुणे महानगर परिवहन मंडळाच्या बस सेवेचा शुभारंभ मंगळवार दि. १ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आला. यावेळी PMPML चे मुख्य वाहतूक व्यवस्थापक श्री. दत्तात्रय झेंडे साहेब यांचे हस्ते पूजन करून सदर सेवेचे उद्घाटन देवस्थान ट्रस्ट चे चेअरमन श्री संतोष बापू धुमाळ, विश्वस्त श्री. हनुमंतराव धुमाळ, श्री. अमोल धुमाळ, श्री. अभिजित धुमाळ, श्री. राजेंद्र कुरपड, श्री. शिवाजी कदम यांचे पस्थितीत करण्यात आले.
यावेळी एस टी संपामुळे गैरसोय होत असणाऱ्या अनेक भाविक ग्रामस्थांनी बस सेवा सुरू झाल्यामुळे समाधान व्यक्त केले. देवस्थान ट्रस्ट ने या साठी अथक पाठ पुरावा केल्यामुळे उपस्थित लोकांनी देवस्थानचे चेअरमन व सर्व विश्र्वस्तांचे जाहीर आभार मानले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त श्री अमोल धुमाळ व प्रस्तावना विश्वस्त श्री. अभिजित धुमाळ यांनी केले. या वेळी देवस्थान चे चेअरमन श्री. संतोष धुमाळ यांनी सादर सेवा व्हावी म्हणून सहकार्य व मार्गदर्शन करणाऱ्या खा. सौ. सुप्रियाताई सुळे, आ. श्री. संजय जगताप, PMPML चे सर्व पदाधिकारी, सर्वपक्षीय प्रमुखांचे, स्थानिक लोकप्रतिनिधींचे आभार मानले. सदर कार्यक्रम मोजक्या ग्रामस्थ भाविकांच्या उपस्थितीत कोविड बाबतचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.