Type Here to Get Search Results !

या गावात जमिनीचा बांध फोडल्या प्रकरणी ठेकेदार विरोधात ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल

 बाहिरवाडी येथे जमिनीचा बांध फोडल्या प्रकरणी ठेकेदार विरोधात ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल



सासवड दि.१५

  


   पुरंदर तालुक्यातील बहीरवाडी येथे जमिनीचा बांध फोडून शेतीचे नुकसान केल्या प्रकरणी सासवड पोलिसात ठेकेदारास विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.या संदर्भात पोलिसांनी 

भारतिय दंड विधान कलम  ४२७ व अनुसुचित  जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम सुधारीत अधिनियम २०१५ चे कलम ३(२) (तीन) , ३(२)(va)५ नुसार गुन्हा दाखल केला आहे


   याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बहिरवाडी येथे राहणारे गणेश बबन ढगारे या महादेव कोळी समाजातील व्यक्तीने या संदर्भात फिर्याद दिली आहे .त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक २८/०२/२०१९ रोजी त्यांच्या शेताचा बांध फोडून आरोपी दशरथ बबन जानकर याने ओढ्यावरील बंधाऱ्याच्या कामासाठी विनापरवानगी रस्ता केला होता. हा रस्ता बंधाऱ्याच्या कामासाठी केला असून काम झाल्यानंतर तुमची जमीन पुन्हा होती तशी करूनं देण्याचे आश्वासन त्याने फिर्यदिंना दिले होते.मात्र काम संपल्यानंतरही त्यांनी त्यांची जमीन पूर्ववत करून दिली नाही. ढगारे यांनी विनंती करूनही आरोपींनी त्याकडे दुर्लक्ष केले . फिर्यादी  अनुसुचित जमातीचा  आसल्याचे माहीत असूनही त्यांची  कोणतीही  परवानगी न  घेता त्यांचे बहीरवाडी ता पुरंदर  येथील जमिन गट नं. 48  मधिल  शेतजमिनीचा  बांध फोडुन त्यांच्या  मालमत्तेचे  नुकसान केले आहे.  म्हणुन त्यानीं  तक्रार दिली आहे. या बाबतचा अधिकचा तपास भोर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील करीत आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies