पत्नीच्या चारित्र्यावर संशय : पतीने केलं संतापजनक कृत्य!

 पत्नीच्या चारित्र्यावर संशय : पतीने केलं संतापजनक कृत्य!



  पिंपरी – चिंचवड


          पिंपरी चिंचवड  शहरात एका व्यक्तीने पत्नीच्या अंगावर डिझेल टाकत तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न  केला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने आणि जेवण बनवायला उशीर झाला असल्याने  नराधम पतीने हे कृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. बाबू उर्फ राहुल पारधे असं आरोपीचं नाव आहे.

           राहुल पारधे आणि त्याची पत्नी पिंपरी चिंचवडमधील नेहरूनगर भागात राहतात. राहुल हा गेल्या काही दिवसांपासून आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातच शनिवारी दुपारी जेवण बनवायला उशीर झाला म्हणून बाबू उर्फ राहुल याने थेट अंगावर डिझेल ओतून पत्नीला पेटवून दिले. या घटनेत पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिने याबाबतची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना दिली.

गुन्ह्याची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस उपनिरीक्षक शीतल गिरी आणि पोलीस उपनिरीक्षक कोकाटे यांनी आरोपी बाबू उर्फ राहुल याला अटक केली. त्याच्यावर कलम ३०७ प्रमाणे खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.