पुरंदर तालुक्यातील या गावात झाली दिवसा ढवळ्या घरफोडी : लाखाचा ऐवज केला लंपास

 

पुरंदर तालुक्यातील या गावात झाली दिवसा ढवळ्या घरफोडी : लाखाचा ऐवज केला लंपास



  वीर : दिनांक ८

पुरंदर तालुक्यातील वीर येथे दिवसा ढवळ्या घरफोडीची घटना घडली असून याबाबत सासवड पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीसांनी  भारतीय दंड  विधान कलम ४५४,३८० नुसार गुन्हा दाखल केला आहे .


       याबाबत सासवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पुरंदर तालुक्यातील वीर येथील तांदळेवस्ती येथे राहणारे ५० वर्षीय दिपक काशीनाथ धसाडे यांनी याबात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या दिर्यादी नुसार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी ते शेतात गेलेले असताना  दुपारी दोन ते पावणे तीन वाजलेच्या दरम्यान  त्यांच्या घराचे कुलूप तोडून  घरातील सोन्याचे दागीने व रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. यामध्ये ७५०००/- रुपये किमतीचे दिडतोळा वजनाचे सोन्याचे गंठण २५०००/- रुपये किमतीची अर्धा तोळा वजनाची सोन्याची कर्णफुले १०००/- रुपये किमतीचा चांदीचा कमरपठ्ठा व पायातील पैजण जोड

  त्याच बरोबर ३०००/- रोख असा १०४०००/ रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे.त्याच बरोबर त्यांच्या घरापासून जवळच वस्तीतील संदीप बंडु धसाडे यांचे सुध्दा घराचे कुलुप तोडुन त्यांचे कपाटातील सोन्याची चैन चोरुन नेली असल्याबाबतची  तक्रार त्यांनी  दिली आहे. याबाबतचा अधिकच तपास सासवड पोलीस स्शाटेनाचे पोलीस निरीक्षक  अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक लोणकर करीत आहे.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..