तालुक्यातील या गावात चंदन चोरांचा धुमाकूळ ; पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला.

 तालुक्यातील या गावात चंदन चोरांचा धुमाकूळ ; पोलीस पाटील व ग्रामस्थांच्या  सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न फसला.



 नीरा दि.८


      पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी  येथे चंदन चोरीचा प्रयत्न गावातील ग्रामस्थ व पोलीस पाटील यांच्या सतर्कतेमुळे  फसला असून.यामध्ये शेतकऱ्याचे 3 तीन चंदनाच्या झालंच नुकसान झाले आहे.



    याबाबत कर्नलवाडी येथील अशोक निगडे यांनी दिलेली माहिती  अशी की, त्यांच्या शेतात चंदनाची सात झाडे आहेत. काल दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री    चोर आल्याची चाहूल ग्रामस्थांना लागली होती. ग्रामस्थांनी गावाचे पोलीस पाटील दिनेश खोमणे यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर खोमणे यांनी गावातील तरुणांना सोबत घेऊन रात्र गस्त सुरू केली.त्याच बरोबर या बाबतची माहिती त्यांनी तातडीने नीरा दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर  यांना दिली.यानंतर पोलिसही या ठिकाणी आले.यावेळी चोरांनी दोन चंदनाची झाडे तोडली होती. तर अन्य तीन झाडे तोडण्याची प्रयत्न सुरू होता. पोलिसांची  चाहूल लागताच चंदन चोरांनी तेथून पळ काढला.पोलिसांनी या ठिकाणाहून एक मोटर सायकल ताब्यात घेतली आहे. ही मोटर सायकल चोरीची असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?