धालेवाडी येथे घरगुती कारणातून महिलेचा कोयता व दगड मारून खून

 धालेवाडी येथे घरगुती कारणातून महिलेचा कोयता व दगड मारून खून



 दि.३


  पुरंदर तालुक्यातील धालेवाडी येथे एका 45 वर्षीय महिलेचा घरगुती भांडणाच्या रागातून कोयता आणि दगड मारुन खून करण्यात आल्याची घटना आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी घडली याबाबतची फिर्याद पोलिसात देण्यात आली असून पोलिसांनी या संदर्भात भारतीय दंड विधान कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे 



   याबाबत जेजुरी पोलिसांकडून देण्यात आलेली माहिती अशी की पुरंदर तालुक्यातील धालेवाडी येथील अक्षय विठ्ठल साबळे याने या संदर्भातली तक्रार जेजुरी पोलिसात दिली आआहे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.03/2/2022 रोजी सकाळी 9/00 वाजता धालेवाडी गावच्या हद्दीत फिर्यादीची आई मयत निर्मला विठ्ठल साबळे हि तिचे शेतजमिनीत काम करीत होतो त्यावेळी तिच्या व आरोपी विशाल माणिक जगताप वय 30 वर्षे रा धालेवाडी ता पुरंदर जि पुणे यांच्यात घरगुती वादाचे कारणावरून वाद झाला .त्यावेळी आरोपीने तिच्या डोक्यात कोयता व दगडाने मारून तिचा खून केला आहे. यासंदर्भातील अधिक तपास जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर हे करत आहेत



Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..