वीर येथे देव दर्शनाला आलेल्या भावीकाच्या सोनसाखळीची चोरी : सासवड पोलिसात फिर्याद दाखल

वीर येथे देवदर्शनाला आलेल्या भावीकाच्या गळ्यातील  सोनसाखळीची चोरी : सासवड पोलिसात फिर्याद दाखल 



वीवीर दि.१६

     पुरंदर तालुक्यातील वीर येथे श्रीनाथमस्कोबाची यात्रा सुरु आहे. या यात्रेत दर्शनासाठी आलेल्या भाविकाच्या गळ्यातील सोन साखळी अज्ञात चोरट्याने चोरली आहे. याबाबत सासवड  पोलिसात फिर्याद देण्यात आली असून पोलिसानी याबाबत भारतीय दंड विधान कलम  ३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

     याबाबत सासवड पोलिसानी दिलेली माहिती असाही कीं, याबाबत  दत्तात्रय जग्गनाथ आनपट रा.दहिसर रेल्वे कॉलनी, मुंबई यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी  दिलेल्या फिर्यादी नुसार ते दिनांक १५  /०२/२०२२ रोजी रात्री १२  ते दिनांक १६/०२/२०२२  रोजी पहाटे ०४   वाजलेच्या दरम्याण वीर येथील  श्रीनाथ म्हस्कोबा मंदीराचे आवारात देवाच्या यात्रेत सहभागी झाले होते. या दरम्यान गर्दीचा फायदा घेत कोणीतरी त्यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाची सोन्याची अंदाजे ४० हजार रुपये किमतीची चैन अज्ञात चोरट्याने चोरून नेहली. याबाबतचा अधिकच तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप मदने करीत आहेत. 


Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.