Sunday, January 9, 2022

सुपे येथील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले : सासवड पोलिसात फिर्याद दाखल

 

सुपे येथील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले : सासवड पोलिसात फिर्याद दाखल



 सासवड दि.९

   पुरंदर तालुक्यातील सुपे खर्ड येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळूवून  नेहल्या प्रकरणी सासवड पोलिसात फिर्याद  देण्यात आली आहे . याप्रकणी मुलीच्या मावसीने आज दिनांक ९ जानेवारी रोजी   सासवड पोलिसात फिर्याद  दिली आहे . या प्रकरणी पोलिसानी  एका संशइत तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे


     याबाबत सासवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मुळच्या सुपे खुर्द येथील व सध्या मुंबई येथील साठेनगर मानखुर्द येथे  राहणार्या ५० वर्षीय महिलेने याबाबतची फिर्याद सासवड पोलिसात  दिली आहे. त्यानी दिलेल्या फिर्यादी नुसार त्यांच्या बहिणीच्या अल्पवयीन मुलीला दिनाक ८/१/२०२२ रोजी पाहाटे 2 वाजले पूर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेहले आहे . ती सध्या १६ वर्षाची असून तिला त्यांच्या ओळखीच्या शुभम सुनील गोरगल या तरुणाने पळवून नेहले असल्याचा संशय त्यानी व्यक्त केला आहे .याबाबतचा अधिकच तपासा सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्ग दर्शना खाली सासवड पोलीस करीत आहेत   

No comments:

Post a Comment

Featured Post

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

 पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला पुणे युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन;...