Type Here to Get Search Results !

फ्रान्स मध्ये आढळला कोरोनाचां आणखी एक व्हेरियंट

फ्रान्स मध्ये आढळला कोरोनाचां आणखी एक व्हेरियंट दि.५


      जगात बहुतेक देशात कोरोणचा कहर बाढला  असताना कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिअंट सापडला आहे. या व्हेरिअंटने ४६ वेळा रुप बदलले आहे. फ्रान्समध्ये नवा  व्हेरिअंट सापडला आहे.
आयएचयू असे या व्हेरियांटचे नाव ठेवण्यात आले आहे.

हा आयएचयू व्हेरिअंट मूळ कोरोना व्हायरसच्या तुलनेत अधिक  शक्तिशाली असून तो सध्याच्या लासित्याच्यावर परिणाम कारक नसतील तो संक्रमक असू शकतो, अशी भीती शास्त्रज्ञांना वाटू लागली आहे.

जगभरात गेल्या महिन्यात ओमायक्रॉनमुळे दहशत पसरली होती. परंतू हा व्हेरिअंट फक्त वेगाने पसरतो, जास्त गंभीर करत नाही, हे समजल्यामुळे थोडा दिलासा मिळालेला आहे.तर आता नव्या व्हेरिअंटने पुन्हा टेन्शन वाढविण्यास सुरुवात केली आहे. पाश्चात्य वृत्त पत्रंनी दिलेल्या वृत्तानुसार Variant IHU चा शोध फ्रान्समध्ये लागला आहे. फ्रान्सच्या मारसैल  मध्ये कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडला असून त्याचे १२ रुग्ण सापडले आहेत. महत्वाचे म्हणजे हे लोक आफ्रिकी देश कॅमेरूनहून परतले होते.

सध्यातरी हा व्हेरियंट किती घातक आणि संक्रमक असेल याबाबत काही सांगता येणार नाही. कारण सध्या फ्रान्समध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंटचा कहर सुरु आहे. दिवसाला सापडत असलेल्या एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे आहेत. 

आयएचयू व्हेरिअंट अन्य देशांमध्ये पसरला आहे का, याचा शोध घ्यावा लागणार आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटना व्हेरिअंट अंडर इन्व्हेस्टिगेशनचा टॅग लावून तपास करेल. आयएचयूचा शोध लावणाऱ्या टीमचे प्रमुख प्राध्यापक फिलिप कोलसन यांनी सांगितले की, हा व्हेरिअंट E484K म्युटेशनपासून बनलाआहे, यामुळे हा व्हेरिअंट अधिक लस विरोधी ताकदीचा असू शकतो. याचा अर्थ यावर लसीचा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies