पुण्यातील १ ली ते ९ वी पर्यंतचे वर्ग बंद ; शिक्षण पुन्हा ऑनलाइन

 पुण्यातील १ ली ते ९ वी पर्यंतचे वर्ग बंद ; शिक्षण पुन्हा ऑनलाइन 




पुणे दि.४


 राज्यात पुन्हा एकदा करोनाच्या रुग्णात मोठी वाढ होत आहे. कोरोनासोबतच ओमायक्रॉनचा धोकाही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे.

 आता पुण्यातही पहिली ते नववीच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज पुण्यात झालेल्या कोविड आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय शहरी हद्दीतील शाळांसाठी घेण्यात आला असून अद्याप पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील शाळांबाबत निर्णय झालेला नाही.

करोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील पहिली ते नववी इयत्तेपर्यंतच्या सर्व शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अकरावीचे वर्गही 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. या विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू राहणार आहे. दरम्यान, दहावी आणि बारावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग मात्र सुरु असणार आहेत. महाविद्यालयांबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होणार आहे.

 


राज्यात आठवडाभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढलेली आहे. सहा दिवसांपूर्वी असलेल्या रुग्णवाढीच्या तुलनेत काल तब्बल सहापटीने रुग्णसंख्या वाढलीय. कोरोनाचा हा विस्फोट होत असताना राज्यात आणखी कठोर निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॉलेज बंद करण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.


Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?