Monday, January 3, 2022

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे विजयी

 जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे विजयी



  सासवड दि.४

   

         पुणे जिल्हा बँकेतील साठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज दिनाक ४ जानेवारी रोजी संप्पन झाली आहे .यामध्ये वाल्हे येथील प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. ते सोसायटी मतदार संघातून निवडणूक लढवत होते. त्यांचा विरोधात असलेल्या दादासाहेब फराटे याना २६४ मते मिळाली तर दुर्गाडी याना ९४८ मते मिळाली आहे एकूण ६८४ मतांच्या मताधिक्याने डॉ.दिगंबर दुर्गाडे विजयी झाले आहेत.दिगंबर दुर्गाडी हे यापूर्वी जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.



           सोसायटी मतदार संघातील या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते दादासाहेब फराटे हे दुर्गाडे यांच्या समोर मोठे आव्हान निर्माण करतील अशी अटकळ बांधली जात होती.मात्र प्रचंड बहुमत मिळवून दुर्गाडे यानी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दुर्गाडे यांच्या निवडी नंतर वाल्हे परिसरात आनंद व्यक्त केला जातो आहे. वाल्हे येथील सरपंच अमोल खवले यानी दुर्गाडे यांचं अभिनंदन केले आहे.कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाके वाजवून आनंद व्यक्त केला आहे.

 झालेले एकूण मतदान १२२९

अवैध मतदान १६

वैध मतदान १२१३

प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे ९४८

दादासाहेब फराटे २६५



No comments:

Post a Comment

Featured Post

निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.

 निरा कोळविहीरे जिल्हा परिषद व पंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेची दमदार एंट्री.  पुरंदर :       पुरंदर तालुक्यातील निरा कोळविहीरे जिल्हा परिषद ...