माळेगाव येथे रीपाई व बहुजन हक्क परिषदेच्यावतीने 

पोलीस स्थापना दिना निमीत्त पोलिसांचा करण्यात आला सन्मान

   


  दि.२



प्रतिनिधी


पोलीस स्थापना दिनानिमित्त रिपाई व बहुजन हक्क परिषद यांच्या वतीने पोलीस बांधवांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आला.


 २ जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस आहे.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाची महत्वपूर्ण भूमिका असते.या स्थापना दिनानिमित्त रिपाई व बहुजन हक्क परिषद यांच्या वतीने पोलीस बांधवांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.


  यावेळी माळेगाव पोलीस दुरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांना रिपाइंचे तालुका युवकाध्यक्ष विश्वास भोसले व बहुजन हक्क परिषद तालुका अध्यक्ष अनिल कदम यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी सोनकसवाडीचे माजी उपसरपंच लालासाहेब धायगुडे, श्रीनिवास जगताप,रसुल शेख, पत्रकार विजय भोसले, संदिप आढाव उपस्थित होते.


  दरम्यान पोलिस बांधवांचा स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यने रिपाइं व बहुजन हक्क परिषद यांचे आभारी असुन जनतेच्या सुरक्षेसाठी कायम तत्पर राहु असे सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांनी सांगितले.


------------------


सध्या राज्यात ओमीक्राॅन कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.सर्व नागरिकांनी मास्क वापरावा.विना मास्क फिरणा-यांना नागरिकांना पाचशे रुपये दंड आकारला जाणार असून सदर मोहीम दि.३ जानेवारी पासून माळेगाव पोलीस दुरक्षेत्राचे हद्दीतील गावात सुरू करण्यात येणार आहे.


राहुल घुगे- सहायक पोलिस निरीक्षक


      


Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..