Saturday, January 1, 2022

कोरोनामुळे मृत झालेल्या कामगारांच्या वारसांना सोमेश्वर कारखान्याने दिली नोकरी.

 

कोरोनामुळे मृत झालेल्या कामगारांच्या वारसांना सोमेश्वर कारखान्याने दिली नोकरी.


सोमेश्वरनगर  दि.१ जानेवारी

    सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात काम करणाऱ्या  कामगाराचे कोराना महामारीत कोरोनामुळे  दुःखद  निधन झाले होते. अशा कामगारांच्या वारसदारांना कारखाना सेवेत कायम सामावून घेण्याचा निर्णय कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप,व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाने घेतला होता.


    कारखान्याने दिलेल्या शब्दानुसार  कोरोनाने मृत्यू झालेल्या दत्तात्रय शिवाजी निंबाळकर यांचे जागेवर त्यांची पत्नी शुभांगी दत्तात्रय निंबाळकर,  अशोक ज्ञानोबा जगताप यांच्या जागेवर मुलगा चेतन अशोक जगताप,  चीफ इंजिनीयर सुखदेव नामदेव टेगले यांच्या जागेवर मुलगा मंदार सुखदेव टेगले,  बाबुराव गणपत गायकवाड यांच्या जागेवर मुलगा प्रणय बाबुराव गायकवाड, महादेव गेनबा शिंदे यांच्या जागेवर मुलगा बापू महादेव शिंदे तर संतोष  अशोक कापरे यांच्या जागेवर पत्नी देवाषी संतोष कापरे
यांना कायमस्वरूपी नोकरी देण्यात आली आहे. 

            आज कर्मचारी संतोष कापरे यांच्या पत्नी देवाशी कापरे यांना नेमणूक पत्र देण्यात आले.यावेळी  कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव संचालक.शांताराम कापरे, माजी कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड, शेतकी अधिकारी बापुराव गायकवाड, लेबर ॲाफीसर दीपक निंबाळकर,शेतकी विभागाचे कार्मचारी .नंदकुमार कामठे.राहुल सोरटे इत्यादी उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment

Featured Post

🔴 एकतर्फी प्रेमातून क्रूर खून! प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून घेतला जीव

 🔴 एकतर्फी प्रेमातून क्रूर खून! प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून घेतला जीव पुणे ग्रामीण | प्रतिनिधी एकतर्फी प्रेमातून निर्मा...