Sunday, January 9, 2022

कर्वेनगर परिसरात दहावीमध्ये शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

   

कर्वेनगर परिसरात दहावीमध्ये शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन केली आत्महत्या




दि.९

     कर्वेनगर परिसरात दहावीमध्ये शिकणाऱ्या १५ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री उघडकीस आला आहे . त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे; पण त्यामधून आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.


      वारजे माळवाडी पोलिस ठाण्यातून मिळालेल्या  माहितीनुसार, संबंधित मुलाच्या कुटुंबात आई-वडील व बहीण असे चौघेजण आहेत. मुलाचे वडील खासगी बँकेत नोकरीस आहेत; तर आई शाळेत शिक्षिका आहे. मोठी बहीण महाविद्यालयात शिकते. शुक्रवारी घरातील सर्वजण आपापल्या कामानिमित्त बाहेर गेले होते. संध्याकाळी मुलाची बहीण घरी आली. त्या वेळी तिला भावाने घरामध्ये गळफास घेतल्याचे आढळून आले. तिने याबाबत तत्काळ आई-वडिलांना सांगितले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत वारजे-माळवाडी पोलिसांना माहिती देण्यात आली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

No comments:

Post a Comment

Featured Post

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

 पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला पुणे युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन;...