पुरंदर पंचायत समिती निवडणुकीत खरी लढत सुरू; ८ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात
पुरंदर पंचायत समिती निवडणुकीत खरी लढत सुरू; ८ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात पुरंदर : पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याचा कालावधी संपताच राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून खरी निवडणूक लढत सुरू झाली आहे. एकूण ८७ अर्जांपैकी ५१ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ८ जागांसाठी विविध पक्षांचे व अपक्ष असे ३३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. आगामी ५ फेब्रुवारी रोजी मतदार कोणाच्या पारड्यात कौल टाकणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. पुरंदर तालुका पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होत असून अर्ज माघारी घेण्याचा मंगळवार (दि. २७) हा शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अर्ज वैधतेनंतर तब्बल पाच दिवसांची मुदत मिळाल्याने विविध पक्षांतील नाराज उमेदवार, तसेच अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी भरपूर वेळ मिळाला. या काळात अनेक 'अर्थपूर्ण' राजकीय घडामोडी घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. आता पंचायत समितीच्या ...