पोस्ट्स

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

इमेज
 पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले.  नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?  पुरंदर :        नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार. भरधाव स्कॉर्पिओनी सुमारे सहा दुचाकींना धडक देत दुचाकीस्वारांना जखमी केले असून. सर्वांवर नीरेतील विविध खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून गंभीर जखमींना बारामती व लोणंद येथे पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्कार्पियो क्र. एम.एच. ४२- एक. क्यू. ७८७८ या गाडीतील ऐका महिलेला सर्पदंश झाल्याने चालक गाडी वेगात दामटत असल्याचे समोर आले आहे.     मंगळवारी (दि.२९) रोजी रात्री नऊच्या सुमारास होळ (ता. बारामती) येथील एका गरोदर महिलेला सर्पदंश झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी त्या महिलेला थेट स्कार्पिओ गाडीत बसून आधी सोमेश्वरनगर व नंतर त्यांची टिर्टमेंट असलेल्या नीरा येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी पाचारण केले. नीरा बारामती रोडने वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने स्कार्पिओ चालकाला गाडी वेगात चालवणे कठीण जातं होते. अती वेगात असलेल्या या स्कार्पिओ चालकाने गाडी कधी रस्त्याच्या मध्यावरुन त...

दिवे घाटात का झाली वाहतूक कोंडी. घाट माथ्यापर्यंत व वडकी गावापर्यंत वाहनांच्या रांगा.

इमेज
 दिवे घाटात का झाली वाहतूक कोंडी.  घाट माथ्यापर्यंत व वडकी गावापर्यंत वाहनांच्या रांगा. नीरा :        पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील दिवे घाटात चालू असलेल्या रुंदिकरणामूळे वाहतूक कोंडी झाली आहे. आज सोमवारी घाटात रुंदीकरण करण्यासाठी ब्लास्टिंग लावले होते. त्यामुळे तासभर रस्त्यावरील वाहतूक रोखण्यात आली होती. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.     आषाढी एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे जात असतो. हा सोहळा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिवे घाटातून जाणार आहे. या पुर्वी घाटातील रस्ता वारकऱ्यांना सुखकर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषंगाने घाटातील रुंदीकरण वेगात सुरू आहे.     मागील आठवड्यात शेवटचे तीन दिवस सलग सुट्टीचे दिवस होते. या काळात रस्त्याच्या कामाला गती देणे गरजेचे होते. आज सोमवारी ऐन कामाच्या दिवशी दिवे घाटात रुंदीकरण करण्यासाठी ब्लास्टिंग करण्यात आले. यामुळे दोन्ही बाजुंनी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. काही बेशिस्ती वाहनचालकांमूळे वाहतूक कोंडी झाली आहे. एसटी...

बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील तिसरा आरोपी वालचंदनगर पोलिसांनी घेतला ताब्यात.....

इमेज
 बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील तिसरा आरोपी वालचंदनगर पोलिसांनी घेतला ताब्यात.....   इंदापूर  आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी..... सुरज उर्फ बापू दशरथ गोसावी असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव..... सहा महिन्यापूर्वी बोपदेव घाटात तरुणीवर झाला होता सामूहिक अत्याचार.....आरोपीला वालचंदनगर पोलिसांनी अकलूज मधून ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती..... दीड तासापूर्वी वालचंद नगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या..... पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात आरोपीला दिल जाणार.....      सहा महिन्यांपूर्वी सासवड शेजारील बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार झाला होता.  या प्रकरणातील तिसरा आरोपी इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिसांनी  ताब्यात  घेतला आहे  ...... संबंधित आरोपीला वालचंद नगर पोलिसांनी अकलूज मधून ताब्यात घेतला आहे. आणि थोड्याच वेळात वालचंद नगर पोलीस या आरोपीला पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत... बापू उर्फ दशरथ गोसावी असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे..... दि. 3 ऑक्टोबर रोजी मित्राबरोबर बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर कोयत्याचा धा...

चारित्र्यावर संशय घेत पतीनेच घोटला पत्नीचा गळा

इमेज
  चारित्र्यावर संशय घेत पतीनेच घोटला पत्नीचा गळा....  300 किलोमीटर अंतरावर नाशिकच्या नांदगाव घाटात फेकला मृतदेह.....  स्वतःच गळा घोटून बायको हरवल्याची इंदापूर पोलिसात दिली होती तक्रार....  तबल तीन महिन्यानंतर इंदापूर पोलिसांनी उलघडलं खुनाच रहस्य.....  इंदापूर पोलिसांनी आरोपी पतीसह आणखी एकाच्या आवळल्या मुसक्या    इंदापूर (पुणे)     पुण्याच्या इंदापूर तालुक्यामध्ये एकानं आपली स्वतःची बायको हरवण्याची तक्रार इंदापूर पोलिसात दिली होती. तीन महिने झाले तरी त्याची बायको पोलिसांना आढळून येत नव्हती. अखेर पोलिसांना धागा दोरा लागला आणि फिर्यादीच खुनी निघाला. काय आहे इंदापूर तालुक्यातील या महिलेच्या खुणा मागचा रहस्य? चला तर मग जाणून घेऊया... चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा केला खून पुण्याच्या इंदापूर मध्ये धक्कादायक अशी घटना घडलीय...बायकोवर चारित्राचा संशय घेत पतीनेच बायकोचा गळा आवळत तिचा खून केलाय,त्यानंतर तिचा मृतदेह इंदापूर पासून जवळपास तीनशे किलोमीटर अंतरावर असणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील घाटात सुमारे दीडशे फुट खोल फेकून दिला.. यान...

पुरंदर मधिल ९३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित. कोठे स्वागत, कुठे नाराजी, संमिश्र चित्र तुमच्या गावात काय आहे सरपंचपदाचे आरक्षण पहा

इमेज
पुरंदर मधिल ९३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित. कोठे स्वागत, कुठे नाराजी, संमिश्र चित्र  तुमच्या गावात काय आहे सरपंचपदाचे आरक्षण पहा  पुरंदर :      गाववाड्यातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षणाच्या सोडती गुरुवारी काढण्यात आल्या. यातून ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे संमिश्र चित्र पाहायला मिळाले. पुरंदर तालुक्यातील ९३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले. तालुक्यातील तहसीलदारांच्या उपस्थितीत पुढील २०२५ ते २०३० या पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत सरपंच आरक्षण ठरले. आरक्षण सोडत काढताना गावागावांतील अनेक इच्छुक मंडळी उपस्थित होती. यात आरक्षणाचा फटका बसल्यामुळे काही जणांच्या पदरी निराशा आली, तर पूरक आरक्षणामुळे सरपंचपदाची संधी मिळण्याच्या आशेमुळे बरेच इच्छुक कामाला लागले.     विशेषतः राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या आणि तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांशी संबंधित असलेल्या गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. यात काहीजणांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. तर ...

बुधवारी 23 एप्रिल रोजी सिंचन भवन समोर सुप्रिया सुळेंच उपोषण.....

इमेज
 गुरुवारी 23 एप्रिल रोजी सिंचन भवन समोर सुप्रिया सुळेंच उपोषण.....  सोशल मीडियातून सुप्रिया सुळे यांनी केली उपोषणाची घोषणा.....  नीरा दि. 21 बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आयोजित केलेल्या बैठकीला पुरंदर उपसा योजनेच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली यामुळे आक्रमक झालेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 23 एप्रिल पासून उपोषणाचा इशारा दिला आहे. 23 एप्रिल रोजी आपण सकाळी दहा वाजल्यापासून पुण्यात सिंचन भावन समोर उपोषण करणार असल्याचं त्यांनी स्वतः सोशल मीडियातून घोषित केलंय. पुरंदर तालुक्यातील वाघापूर येथील पंप स्टेशनवर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी तीन वाजता संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची  आणि पुरंदर मधील शेतकऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी एक आठवड्यापूर्वी नियोजन  करण्यात आले होते.मात्र या बैठकीला केवळ कार्यकारी अभियंता अशोक शेटे हेच उपस्थित राहिले.शिवाय त्या ठिकाणी कोणतीही बैठकीच्या दृष्टीने तयारी केली नव्हती एकूणच प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत थेट सिंचन भवनासमोर उपोषणाची घोषणा केली आहे.  ...

बारामतीच्या या गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

इमेज
 बारामतीच्या या गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार  आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या   बारामती ( पुणे)   बारामती तालुक्यातील मूर्टी येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली असून याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोप ताब्यात घेतले आहे.    या संदर्भात वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बारामती येथील मूर्टी येथे हा प्रकार घडला आहे. आरोपी आण्णा किसन गोफणे रा.मोराळवाडी ता.बारामती जि.पुणे याने दिनांक 20/4/2025 रोजी दुपारी तीन वाजलेच्या दरम्यान हा लैंगिक अत्याचाराचा गुन्हा केला आहे. आरोपीने पिढीत निर्भयाच्या घरामध्ये प्रवेश केला आणि घरामध्ये ती एकटीच असल्याचे पाहून तिच्या वर लैंगिक अत्याचार केले. हा घडलेला सर्व प्रकार पिढीतेने आपल्या घरातील लोकांना सांगितला. त्यानंतर याबाबतची फिर्याद वडगाव निंबाळकर पोलिसात देण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.तर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.उद्या त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्याचा अधिकचा...