पोस्ट्स

जेऊर सोसायटीच्या निवडणुकीत श्री भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनलचा विजय

इमेज
 जेऊर  सोसायटीच्या  निवडणुकीत श्री भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनलचा विजय  दि.२६ पुरंदर तालुक्यातील जेऊर येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. असून या निवडणुकीत भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे. या पॅनलने १३ पैकी १३ जागांवर विजय मिळवला आहे.               जेऊरग्राम विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सन २०२२ ते २०२७ या पाच वर्षासाठी दिनांक २५ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पारपडली. या निवडणूकित श्री भैरवनाथ जयमल्हार ग्रामविकास पॅनलने सत्ता कायम राखत १०० मतांच्या फरकाने १३ :० ने विजय प्राप्त केला. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन श्री उत्तम धुमाळ यांच्यावर विश्वास ठेवत सभासदांनी चौथ्यांदा संस्थेची सत्ता दिल्याबद्दल संस्थेच्या सभासदांचे त्यांनी आभार मानले. 

सासवड येथे मोटर सायकल कारचा अपघात एक मुलगी गंभीर जखमी

इमेज
 सासवड येथे मोटर सायकल कारचा अपघात एक मुलगी गंभीर जखमी सासवड दि.१६   पुरंदर तालुक्यातील सासवड येथे काल दिनांक २५ एप्रिल.रोजी बेकदरपणे वाहन चालवून अपघात केल्या प्रकरणी एका कार चालकाच्या विरोधात फिर्याद देण्यात आली आहे.या संदर्भात पोलिसांनी कार चालकाच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 279, 337, 338, 427, व मोटार वाहन कायदा कलम184 नुसार गुन्हा दखल केला आहे.    याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, यासंदर्भात सासवड येथे राहणारे दिपक शिवाजी गार्डी यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दिनांक २५ एप्रिल रोजी ते स्पेंल्न्डर मोटारसायकल नं MH12FN1772 वरुन त्यांचे मुलांसह कन्हैया चौक सासवड मार्गे पारगावकडे जात असताना जेजुरी नाका चौकात पुणे बाजुकडुन येणारी मारुती ईको कार नं MH12LP8827 हीने त्यांच्या मोटारसायकलीस भरधाव वेगात येवुन जोरात ठोस देवुन अपघात केला. अपघातात त्यांच्या मुलीच्या उजव्या पायाचे नडगीचे हाड फ्रँक्चर करुन गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्या मोटार सायकलला अपघात करून मुलीच्या दुखापतीस कारणीभुत झाल्या प्रकरणी त्यांनी त्यांनी मारुती ई...

घेरा पुरंदर येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू.

इमेज
 घेरा पुरंदर येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू. मृतदेह खड्ड्यात पुरून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न नीरा दि.२६    पुरंदर तालुक्यातील घेरा पुरंदर येथे शेतात तारा लाऊन त्याला विद्युत  करंट दिल्याने एका स्थानिक नागरिकांचा मृत्यू झालाय.यानंतर मृत देहावर माती टाकून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे.या प्रकरणी सासवड पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली असून  याबाबत भारतीय दंड विधान कलम 304,201 v 34 नुसार सासवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घेरा पुरंदर या गावामध्ये आरोपी भाउसो मारूती कोंडके व शंकर सखाराम कारकुड,  दोघे राहणार रा.घेरापुरंदर, ता.पुरंदर,जि.पुणे. यांनी  दिनांक १९/१०/२०२१ रोजी  रोजी  ९ वा. चे सुमारास शंकर कारकुड याचे शेतात रानडूकरांपासून भाताच्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी व रानडूकराची शिकार करण्यासाठी उघडयावर तारा लावुन त्याला करंट दिला होता .त्याला चिटकुन एखादयाचा मृत्यू होवू शकतो याची जाणीव असतानाही त्यांनी विदयुत करंट दिला. त्या तारांमुळे सुनिल मारूती ढगारे यां...

नीरा - वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट २४ तास राहणार बंद,

इमेज
 नीरा - वाल्हा दरम्यानचे रेल्वे गेट २४ तास राहणार बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याची रेल्वे प्रशासनाची सूचना .  नीरा दि.२५      पुणे - पंढरपूर पालखी महामार्गावर असणाऱ्या पिंपरे खुर्द हद्दीत थोपटेवाडी येथे असणारे रेल्वे गेट बुधवारी दिवसभर वाहतुकी साठी २४  तास बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. या दरम्यान लोकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं रेल्वे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.    पुरंदर तालुक्यातील पुणे- पंढरपूर महामार्गावर थोपटेवाडी येथे रेल्वेचे २७ नंबरचे गेट आहे. हे गेट  रेल्वे मार्गाचे काम करण्यासाठी  बुधवार दिनांक २७ एप्रिल रोजी सकाळी ६  ते गुरुवार दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी  सहा वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दरम्यान नागरिकांनी वाहतुकीसाठी निरा- मोरगाव- जेजुरी या मार्गाचा वापर करावा, असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. स्थानिक लोकांनी त्यांना शक्य असेल त्या मार्गाचा वापर करून रेल्वे प्रशासनास सहकार्य...

राणा पती पत्नीने धार्मिक कार्यक्रम घरी करायला हवे होते : शरद पवार

इमेज
  राणा पती पत्नीने धार्मिक कार्यक्रम घरी करायला हवे होते : शरद पवार मुखमंत्री हे संस्थात्मकपद आहे त्याची   गरिमा राखायला हवी.     मुंबई दि.२५                    राणा पतीपत्नीने धार्मिक कार्यक्रम घरी करायला हवे होते. अस मत राष्ट्रवादीचे   अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय माध्यमांनी   विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. त्याच बरोबर ते म्हणाले कि, मुख्य्मंतीपद हे संस्थात्मकपद आहे. त्याचा मान सन्मान या लोकांनी राखायला   हवा.          राज्यात मागील चार पाच दिवसात राणा पती पत्नीचा गोंधळ सुरु आहे. राज्य सरकार विरोधात   दोघांनी बोंब सुरु केली आहे. हनुमान चालीसा उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन   म्हणणार हा हट्ट त्यांनी धरला आहे. खरे तर ठाकरे कुटुंब हे पूर्वी पासूनच धार्मिक कुटुंब आहे.पूजाअर्चा   किंवा धार्मिक कुलधर्म कुलाचार करताना ठाकरे कुटुंबाला संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहे.शिवासेनेच्या माध्यमातून हिंदुत्वाचा...

क्रीडा शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार: बलात्कार व गंभीर मारहानीचा गुन्हा दाखल

इमेज
   क्रीडा शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार: बलात्कार व गंभीर मारहानीचा गुन्हा दाखल  मुंबई प्रतीनिधी. दि.२५ डोंबिवली येथे एका क्रीडा शिक्षकाने  विद्यार्थिनी वर अत्यार केल्याची घटना उघडकीस आली आहे.या क्रीडा शिक्षकाने  विद्यार्थिनीवर अत्याचार करत तिला अमानुष मारहाण केली आहे. याबाबत पीडितेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली असून मानपाडा पोलिसांनी या क्रीडा शिक्षकाला  बेड्या ठोकल्यात आहेत. रामेश्वर पाठक असे त्या शिक्साकाचे नाव  आहे.  डोंबिवलीत राहणारी २७ वर्षीय पीडित तरुणी २०२२  साली शाळेत असताना एका राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेली होती. यावेळी तिचा  क्रीडा शिक्षक  असलेल्या रामेश्वर पाठक याने त्या तरुणीसोबत ओळख वाढवत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. काही कालावधीनंतर  दुसऱ्या मुलांशी बोलते म्हणून रामेश्वर हा या तरुणीला मारहाण करू लागला. या तरुणीला रामेश्वर याने १८ मार्च २०२२ रोजी  रॉडने अमानुष मारहाण केली. या मारहाणीत पीडित तरुणीच्या पायाचे हाड मोडले . त्याच बरोबर त्या पिढीत तरुणीचे  अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब...

जबरदस्त वास्तव: लोकशाही आणि आजची मुसलमानाची आजची अवस्था : पैगंबर शेख

इमेज
  जबरदस्त वास्तव: लोकशाही आणि आजची मुसलमानाची आजची अवस्था : पैगंबर शेख